SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खोलीतील छुपा कॅमेरा झटक्यात सापडणार, ‘ओप्पो’कडून ‘हे’ जबरदस्त फिचर सादर..!

महाराष्ट्राच्या राजकारणात एका ‘स्टिंग ऑपरेशन’वरुन नुकतीच मोठी खळबळ उडाली… एखाद्या वस्तूंमध्ये छुपा कॅमेरा बसवून अशा प्रकारचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले जाते.. महिलांच्या चेंजिग रुम किंवा हाॅटेलमधील खाेल्यांतही असे छुपे कॅमेरे आढळले आहेत.

चुकीच्या कामासाठी छुपे कॅमेरे बसवले जातात, जे सहजासहजी कोणाच्या नजरेस पडत नाहीत. त्यातून लोकांचे खासगी आयुष्य चारचौघांसमोर येते.. बदनामीची भीती दाखवून अशा लोकांना लुटण्यात येते.. मात्र, आता अशी भीती बाळगण्याची गरज नाही.. कारण, ‘ओप्पो’ (Oppo) या चीनच्या स्मार्टफोन कंपनीने एक खास फीचर सादर केलं आहे.. याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

‘ओप्पो’च्या नव्या फिचरबाबत..
‘ओप्पो’ स्मार्टफोनच्या ‘ऑपरेटिंग सिस्टम’मध्ये नव्याने ‘कलर्स ओएस’ (ColorOS) अपडेट देण्यात आलं आहे. या फिचरच्या मदतीनं स्पा, सार्वजनिक वॉशरूम, चेंजिंग रूम किंवा हॉटेलच्या खोलीतील छुप्या कॅमेऱ्यांची माहिती सहज कळू शकते. त्यामुळे सतत प्रवास करणाऱ्यांसाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे..

‘ओप्पो फाईंड एक्स- 5’ (Oppo Find X5) आणि ‘ओप्पो फाईंड एक्स-5 प्रो’ (Find X5 Pro) या कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर हे फिचर दिसलं आहे. ‘कलर्स ओएस’ या नवीन व्हर्जनमुळे कोणत्याही छुप्या स्पाय कॅमेऱ्याचा वायरलेस सिग्नल स्कॅन करता येणार आहे.

Advertisement

छुपे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक कम्पोनंट्स शोधण्यासाठी ही सिग्नल डिटेक्शन पद्धत बनवली आहे. ‘ओप्पो’ कंपनीने नुकतीच चीनी सोशल मीडियाला याबाबतची माहिती दिली.. त्यानुसार, ‘कलर ओएस-12.1’मुळे छुपे कॅमेरे शोधात येतील.

सध्या हे फीचर ‘फाईंड एक्स-5’ स्मार्टफोनमध्ये ‘हिडन कॅमेरा डिटेक्शन’ (Hidden Camera Detection) अ‍ॅपच्या माध्यमातून शोधता येईल. लवकरच हे फिचर अन्य स्मार्टफोनमध्येही उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

कसे काम करते..?
– सध्या हे अ‍ॅप ‘बीटा’ व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. ते डाउनलोड केल्यानंतर ‘स्पाय कॅमेरा’ स्कॅन करण्यासाठी स्मार्टफोनचा वाय-फाय (Wi-Fi) आणि हॉटस्पॉट बंद करावा लागतो.
– खोलीतील लाईट्सही बंद करण्यास सांगितलं जातं. त्यामुळे अंधारातून स्पाय कॅमेऱ्याची इंफ्रारेड लाईट डिटेक्ट करता येते, जी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरली जाते.
– ‘स्पाय कॅमेरा’ डिटेक्ट झाल्यानंतर अ‍ॅपमधून आवाज येतो.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement