SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फेसबुक’वरील ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ खरी की खोटी..? या ‘ट्रिक्स’ वापरुन ओळखा खरा मित्र..

हातात स्मार्टफोन आल्यापासून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय.. अनेक जण स्वत:ला व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार घेतात. या सोशल मीडियावरील सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप म्हणजे, फेसबूक.. सोशल मीडियावरील हे सर्वाधिक जूने अ‍ॅप आहे..

प्रत्यक्षात कधीही न भेटलेले लोक ‘फेसबूक’वर एकमेकांना जोडलेले असतात. त्यातून ‘फेसबूक फ्रेंड’ ही संकल्पना समोर आली. ‘फेसबूक’वर अनेकांना सातत्याने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ येत असतात. मात्र, कधीही त्या सरसकट स्वीकारु नयेत. त्यातून तुम्हीच एखाद वेळी अडचणीत सापडू शकता..

Advertisement

बऱ्याचदा फेसबुकवर आधीच ‘फ्रेंड’ असलेल्या मित्राची पुन्हा ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ येते. मग अशा वेळी या मित्राचे कोणते प्रोफाइल खरं नि कोणते बोगस.. असा प्रश्न पडतो.. अनेक फेसबुक वापरकर्त्यांना या समस्या आल्या आहेत. एकाच व्यक्तीच्या नावाने अनेक वेळा रिक्वेस्ट आल्याच्या तक्रारी युजर्सने केल्या आहेत.

एकाच माणसाच्या अनेकदा ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आल्याने तुम्हीही विचारात पडला असाल.. पण घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही काही ‘ट्रिक्स’ वापरुन त्यातील खरा मित्र कोण, हे शोधू शकता.. कसे ते जाणून घेऊ या..

Advertisement

खरा मित्र कसा ओळखणार..?
– ‘फेसबूक’वरील ‘प्रोफाइल फोटो’ पाहून ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवणाऱ्याची ओळख होऊ शकतं. प्रोफाईल फोटो नसल्यास किंवा फोटोवरुनही मित्र असल्याचे स्पष्ट होत नसल्यास प्रोफाइलमधील ‘अबाऊट’ (About) सेक्शनमध्ये माहिती तपासावी. शिवाय त्या व्यक्तीची ‘फ्रेंड लिस्ट’ पाहिल्यावरही तुमच्या ‘कॉमन फ्रेंड्स’चा अंदाज घेता येईल.

– अनेकदा तुमच्या मित्राच्या नावाने ‘फेक फेसबूक प्रोफाइल’ बनवलं जातं.. याबाबत तुमच्या मित्राला काहीच माहिती नसते. त्यामुळे अशी फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास थेट मित्राला फोन करुन माहिती घ्यावी. त्याच्या नावाने ‘फेक प्रोफाइल’ बनवलं असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून द्यावं..

Advertisement

– फेसबूक प्रोफाइल ‘यूआरएल’द्वारेही (Facebook Profile URL) ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ खरी की खोटी, हे पाहता येते. ‘फेसबूक प्रोफाइल यूआरएल’मधील नाव व प्रोफाइलमधील नावात बदल असल्यास ते ‘प्रोफाइल’ फेक किंवा हॅकरचं असू शकतं.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement