SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कमी भांडवलात घरबसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय, तुमच्यावर पडणार पैशांचा पाऊस..!

अनेकांना नोकरीपेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते. मात्र, त्यासाठी लागते ते थोडेसे धाडस.. नि अर्थातच भांडवल..! स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यात जोखीम असली, धोके असले, तरी त्यात चांगला जम बसल्यास होणारी कमाईही मोठी असते.. शिवाय तुमच्यामुळे इतर चार लोकांच्या हातांनाही काम मिळू शकते..

सध्या असे अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत, जे कमी भांडवलातही सुरु करता येतात. मोदी सरकारनेही उद्योग-व्यवसाय वाढीसाठी ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो..

Advertisement

कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी बाजारात त्या वस्तूला किती मागणी आहे, त्याचे मार्केट कसे असेल, याबाबत समजून घ्यायला हवे.. तुम्ही अगदी कमी भांडवलात, मात्र चांगली कमाई करुन देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

कमी भांडवलात करा ‘हा’ व्यवसाय..
सध्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत एका वस्तूला मोठी मागणी आहे. ते म्हणजे, एलईडी (LED) बल्ब..! एलईडी बल्बमुळे प्रकाशही चांगला मिळतो, सोबतच वीजबचतही होते. बील कमी येतं. हा बल्ब टिकावू असतो नि बराच काळ चालतो. शिवाय त्याला वाॅरंटीही मिळते. प्लास्टिकचा असल्याने फुटण्याची भीती नसते.

Advertisement

‘एलईडी’ म्हणजे ‘लाइट एमिटिंग डायोड’… एका बल्बचे आयुष्य साधारण 50,000 तास किंवा त्यापेक्षा जास्त असते. ‘सीएफएल’ (CFL) बल्बचे आयुष्य 8000 तासांपर्यंत असतं. विशेष म्हणजे, ‘एलईडी’ बल्ब हे रिसायकल करता येतात.

प्रशिक्षण कुठे मिळणार..?
‘एलईडी बल्ब’च्या व्यवसायातून अनेक जण मोठी कमाई करीत आहेत. त्यासाठीचे प्रशिक्षण सरकारकडून दिलं जाते. ‘मिनिस्ट्री ऑफ मायक्रो’, ‘स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायजेस’ अंतर्गत अनेक संस्था ‘एलईडी’ बल्ब तयार करण्याचे ट्रेनिंग देतात. शिवाय स्वयंरोजगार कार्यक्रमाअंतर्गतही ‘एलईडी’ बल्बबाबत प्रशिक्षण मिळते.

Advertisement

एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्याही ट्रेनिंग देतात. ट्रेनिंगदरम्यान तुम्हाला एलईडी बल्बचे बेसिक, पीसीबी बेसिक (Basic of PCB), एलईडी ड्रायव्हर (LED Driver), फिटींग-टेस्टिंग (Fitting-Testing), मटेरियल खरेदी, मार्केटिंग, सरकारी सबसिडीबाबत माहिती दिली जाते.

किती पैसा लागेल..?
‘एलईडी’ बल्ब तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी जादा गुंतवणूक करावी लागत नाही. तुम्हाला छोट्या स्तरावर फक्त 50,000 रुपयांत हा बिझनेस सुरू करता येतो. या कामासाठी तुम्हाला दुकानाचीही गरज नाही. तुम्ही घरबसल्या आरामात हा व्यवसाय सुरु करु शकता.

Advertisement

कमाई किती होते..?
साधारणपणे एक बल्ब तयार करण्यासाठी जवळपास 50 रुपयांपर्यंत खर्च येतो. बाजारात हा बल्ब आरामात 100 रुपयांपर्यंत विकला जातो. म्हणजेच एका बल्बवर दुप्पट नफा होतो. तुम्ही रोज 100 बल्ब तयार केल्यास, 5000 रुपयांचा निव्वळ नफा होतो. दरमहा तुम्ही 1.50 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. व्यवसाय वाढत गेल्यास, कमाईचा आकडाही वाढत जातो..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement