SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

80 हजारांचा आयफोन मिळतोय अगदी फ्री! ‘या’ कंपनीची धमाकेदार ऑफर..

आपल्यापैकी काही जणांना महागडे आणि भारीच भारी स्मार्टफोन घायची सवय असते. काहींना शौक असतो तर काहींना हौस! नाही का? तर मग जगात प्रसिद्ध आणि अव्वल कंपनीचा म्हणजेच Apple (ॲपल) कंपनीचा स्मार्टफोन तुम्हाला आज कमी किंमतीत नव्हे तर चक्क मोफत भेटू शकतो त्यासाठी फक्त एक छोटंसं काम तुम्हाला करावं लागणार आहे. त्यातसुद्धा तुम्हाला फार काही कष्टाचं काम नसणार आहे.

दिग्गज कंपनी Apple चे आयफोन बहुतांश जण वापरत नाही कारण ते महागडे असतात, त्यामुळे सर्वसामान्य लोक ते खरेदी करत नाहीत. Apple च्या iphone ची माहिती मात्र सर्वाना असते. हे आयफोन्स खरेदी करण्याची इच्छा देखील असते परंतु किंमत परवडणारी नसल्याने वापरायचं स्वप्न फक्त स्वप्नच राहून जातं. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशा एका जबरदस्त जॅकपॉट ऑफरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही लेटेस्ट फ्लॅगशिप iPhone 13 अगदी मोफत मिळवू शकता.

आयफोन घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण…!

आयफोन फ्री मध्ये मिळवण्यासाठीच्या या ऑफरची सुरुवात भारतातील पेमेंट अ‍ॅप पेटीएमने (Paytm) सुरु केली आहे. या धमाकेदार ऑफरचं नाव जॅकपॉट ऑफर आहे. होय! पेटीएमच्या या ऑफरमध्ये सहभागी होऊन तुम्ही मोफत iPhone 13 मिळवू शकता. पेटीएमच्या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही 79,900 रुपयांचा iPhone 13 अगदी मोफत घरी आणून सेलिब्रेट करू शकता. तुम्हाला यासाठी Paytm App तुमच्या मोबाईलमध्ये करावं लागणार आहे.

पेटीएम जॅकपॉट ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागणार..?

▪️ सर्वप्रथम पेटीएम अ‍ॅप ओपन करा. होम स्क्रीनवर वरच्या बाजूला डावीकडे तुमच्या प्रोफाईलवर क्लिक करा.
▪️ साईड मेन्यूमधील ‘कॅशबॅक अँड ऑफर्स’ या चौथ्या ऑफरची निवड करा.
▪️ तिथे ‘Jackpot: Participate to Win’ कॉलममध्ये ‘iPhone 13’ चा दुसरा ऑप्शन असेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर ऑफरची माहिती दिसेल.
▪️ आता सर्वात खाली ‘Participate now for 100 Points’ पर्याय दिसेल.
▪️ तुम्ही या जॅकपॉटमध्ये 100 कॅशबॅक पॉइंट्स वापरून सहभागी होऊ शकता.
▪️ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही या ऑफरमध्ये सहभागी होऊ शकता.
▪️ सहभागी होताना तुम्हाला या ऑफरचे सर्व नियम व्यवस्थित वाचून घ्यावे लागतील.
▪️ ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी 20 मार्च, 2022 पासून 31 मार्च, 2022 दरम्यान वेळ असेल.
▪️ महत्वाची गोष्ट म्हणजे कॅशबॅक पॉइंट्स हे पेटीएम अ‍ॅपवरून पैसे खर्च केल्यावर मिळत असतात हे लक्षात असू द्या.


(हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीच्या आधारे लिहिला गेला आहे. आयफोन विजेत्याविषयी Spreadit कोणतीही घोषणा करणार नाही. याची जबाबदारी संबंधित कंपनीची असणार आहे.)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा

Advertisement