SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

4G स्मार्टफोनच्या किंमतीत मिळतोय ‘हा’ 5G स्मार्टफोन, किंमत पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त..!

स्मार्टफोनच्या दुनियेत अनेक कंपन्या आपला ठसा उमटवत असून आता एका कंपनीने स्वस्त स्मार्टफोन आणला आहे हा स्मार्टफोन 5G असून या कंपनीचं नाव रिअलमी (Realme) आहे. Realme नं आता हळूहळू भारतात आपली बाजारपेठ वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कंपनीने अनेक आकर्षक स्मार्टफोन बाजारात खास फीचर्ससोबत लाँच केले आहेत. जर तुम्हीही स्वस्त 5G स्मार्टफोनच्या शोधात असाल आणि बजेटही कमी असेल तर तुम्ही खालील माहिती पूर्ण वाचा आणि खरेदीची तयारी करा.

भारतीय बाजारपेठेवर चिनी कंपन्यांचं वर्चस्व वाढत असलं तरी दुसरीकडे याच कंपन्या कमी किंमतीत भारतीयांना अधिकाधिक उत्कृष्ट फीचर्स देऊन आकर्षित करत आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांपैकी एक दिग्गज कंपनी रिअलमीने आता Realme 9 सीरिज अंतर्गत Realme 9 5G व Realme 9SE 5G असे नाव असलेले दोन जबरदस्त स्मार्टफोन लॉंच केले आहेत. यातील Realme 9 5G स्मार्टफोन देशात 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह आला आहे. हा फोन 15 हजार रुपयांच्या आतील स्मार्टफोन असणाऱ्या रेडमी कंपनीला चांगली टक्कर देऊ शकतो.

Advertisement

स्टॉक उपलब्ध झाल्यानंतर फ्लिपकार्टवरून खरेदी करण्यासाठी क्लिक करा 👉
Take a look at this realme 9 5G (Meteor Black, 64 GB) on Flipkart https://dl.flipkart.com/s/03CNAFNNNN (सध्या फक्त Notify me वर क्लिक केल्यास स्टॉक उपलब्ध झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल.)

Realme 9 5G चे स्पेसिफिकेशन्स वाचा..

Advertisement

▪️ भारतात रिअलमी 9 5G फोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह आला आहे. जो पंच-होल डिजाईनसह 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
▪️ अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड रिअलमी वनयुआयवर चालतो.
▪️ प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेनसिटी 810 चिपसेट.
▪️ 6GB पर्यंत फिजिकल रॅम आणि 5जीबी व्हर्च्युअल रॅम मिळून 11GB रॅम.
▪️ 128GB पर्यंत स्टोरेज.
▪️ फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ब्लॅक अँड व्हाईट पोर्टरेट कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स यांचा समावेश.
▪️ सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा.
▪️ बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर
▪️ पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी.

Realme 9 5G ची किंमत

Advertisement

दरम्यान येत्या काही महिन्यांतच 5G ची सेवा सुरु होत असल्याने हा फोन विक्रीत रेकॉर्डही करू शकतो. रिअलमी 9 5G फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल 14 मार्चपासून Black आणि White कलरमध्ये विकत घेता येईल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement