SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’चे नूतनीकरण वेळेत करा, नाहीतर बसू शकतो ‘असा’ मोठा फटका..!

ड्रायव्हिंग लायसन्स.. म्हणजेच वाहन चालविण्याचा अधिकृत परवाना.. एक असं सरकारी कागदपत्र, जे तुम्हाला वाहन चालवण्याची परवानगी देते. शिवाय ओळखपत्र म्हणूनही त्याचा वापर होतो. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ नसताना, वाहन चालविताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.

‘आरटीओ’कडून ठराविक काळासाठी ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ (Driving License) जारी केले जाते. तो काळ पूर्ण झाल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा ‘लायसन्स’चे नूतनीकरण करावे लागते.. जूने ‘लायसन्स’ रिन्यू न केल्यास, ते रद्द समजले जाते व तुमच्यावर कारवाईही होऊ शकते..

Advertisement

दरम्यान, मोदी सरकारने नवीन मोटार वाहन कायदा लागू केला आहे. त्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियम पूर्वीपेक्षा अधिक कठोर केले आहे. नियम न पाळणाऱ्यांवर आता मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो. त्यात तुमचा खिसा खाली होऊ शकतो. त्यामुळे या नियमांबाबत माहिती असायलाच हवी..

नव्या कायद्यात ‘ड्रायव्हिंग लायसन्स’बाबतचे नियम स्पष्ट केले आहेत. त्यानुसार, ‘लायसन्स’ची मुदत संपलेली असल्यास लवकरात लवकर त्याचे नूतनीकरण करा. त्यास जितका वेळ लावाल, तितकी दंडाची रक्कम वाढत जाणार आहे.. याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

दंडाच्या रकमेत वाढ..
‘ड्रायव्हिंग लायसन्स’ रिन्यू करण्यासाठी याआधी फक्त 474 रुपये भरावे लागत.. त्यात परवाना नूतनीकरणासाठी 200 रुपये व ‘आरटीओ’साठी 200 रुपये, स्मार्टचिप कंपनीला 74 रुपये शुल्क होते.. एक वर्ष विलंब झाल्यास 300 रुपये, तर 2 वर्षांच्या विलंबासाठी 1074 रुपये दंड भरावा लागत होता. मात्र, आता त्यात मोठी वाढ झाली आहे.

आता ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. ‘लायसन्स’च्या नूतनीकरणास एक एक वर्ष पुढं ढकललं, तर प्रत्येक वर्षासाठी 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे..

Advertisement

येथे सुरक्षित ठेवा कागदपत्रे
‘ड्रायव्हिंग लायसन्स’, आरसी आणि वाहन विम्यासह इतर महत्त्वाची कागदपत्रे आता ऑनलाइन सुरक्षित ठेवता येतात. त्यासाठी केंद्र सरकारने ‘डिजी लॉकर’ची सुविधा दिलीय. त्यात कोणतेही शुल्क न भरता, कोणीही आपली कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. गरज भासल्यास ते दाखवू शकता.

खाते कसे तयार करणार..?
– सर्वप्रथम digilocker.gov.in या संकेतस्थळावर जा. तेथे ‘Signup’ वर क्लिक करा.
– तुमचे नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी आदी माहिती भरा व तुमचा पासवर्ड टाका.
– तुमच्या मोबाईलवर येणार ‘ओटीपी’ किंवा फिंगर प्रिंट पर्याय वापरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.
– नंतर तुमचे युजरनेम व पासवर्ड तयार करून लॉग इन करू शकता.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement