SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घर खरेदीसाठी सरकार देणार अडीच लाख रुपये, शेवटची मुदत ‘या’ तारखेपर्यंतच..

देशातील अनेक कुटुंबाना नवीन घर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातून लाभ मिळतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा 2014 साली सत्तेत आले तेव्हा त्यांनी ही योजना सुरु केली. देशात सर्व जणांना राहण्यास घर मिळावे या हेतूने सरकारकडून काही योगदान असावे जेणेकरून देशातील कुटुंबाना घर घेताना जास्त फायदा होईल. आता पंतप्रधान आवास योजनेसाठी (PM Awas Scheme) नागरिकांनी अजूनही अर्ज नसेल केला तर त्यांनी लवकर अर्ज करावा.

आमच्याकडे नोटा नसल्यानं आमचा पराभव झाला; संजय राऊतांच्या या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं?

Advertisement

देशभरातील नागरिक जर पहिल्यांदा घर खरेदी करत असेल तर त्यांना गृहकर्जासाठी (Home Loan) 2 लाख 67 हजार रुपयांचे अनुदान (Subsidy) सरकारकडून मिळते. देशामधील अनेक जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी बनण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता घाई करावी लागणार आहे, कारण या योजनेसाठी आता काही दिवसांचीच मुदत शिल्लक आहे. ती अंतिम मुदत चालू महिन्यात संपणार आहे. म्हणून आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेवटचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. म्हणून घर खरेदी करण्याचा निर्णय तुम्हाला घेऊन कागदपत्रांची जमवाजमव झाली तर योजनेचा लगेच लाभ घेता येणार आहे.

योजनेचा लाभ कसा मिळणार?

Advertisement

जर तुम्हाला पहिल्यांदाच स्वतःच्या नावाने घर खरेदी करायचे असेल, तसेच गृहकर्ज आणि रजिस्ट्रीत स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे असेल अशा नागरिकांसाठीच हे अडीच लाखांचे अनुदान मिळत असते. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपासून ते 18 लाख रुपयांपर्यंत आहे, अशा गृहकर्जधारकांना योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्यांचे उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे, त्यांना 6 लाखांच्या कर्जावर 6.5 टक्के सबसीडी, 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 9 लाखांच्या कर्जावर 4 टक्के सबसीडी तर 18 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्के सबसीडीचा लाभ मिळतो.

अंतिम मुदत किती तारखेपर्यंत?

Advertisement

देशातील नागरिकांच्या फायद्याच्या या योजनेसाठी लाभार्थी बनायचं असेल तर लवकरात लवकर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसीडीचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2022 पर्यंत आहे. म्हणून तुम्हाला अर्जप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या योजनेअंतर्गत पहिले घर खरेदी करताना (गृहकर्जासाठी) बँका ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांचा अर्ज भरून घेतात. योजनेच्या सबसिडीसाठीचा अर्ज पोर्टलवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर 5 व्या टप्प्यात सबसिडी गृहकर्ज खात्यात जमा होते. योजनेची मुदत 31 मार्च असली तरीही काही बँका 15 मार्च, 22 मार्चपर्यंतच ग्राहकांना मुदत देत आहेत. त्याच्या आत जर तुमचा अर्ज पोर्टलवर अपलोड केला तरच सबसिडी मिळेल, अन्यथा तुम्ही अनुदानाच्या फायद्यापासून यावर्षी वंचित राहू शकतात, अशी माहिती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement