SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फ्लिपकार्ट’चा ‘बिग सेव्हिंग डेज्’ सेल आजपासून सुरु, कोणत्या वस्तूंवर किती ‘डिस्काऊंट’ मिळणार..?

तुम्ही शाॅपिंग करण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.. ई-काॅमर्स क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे, ‘फ्लिपकार्ट’..! येथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू अगदी स्वस्तात खरेदी करता येतात.. त्यात आता ग्राहकांसाठी आणखी एक मोठी संधी आली आहे. त्यामुळे खास डिस्काऊंटसह खरेदी करता येणार आहे..

होय, ‘फ्लिपकार्ट’चा ‘बिग सेव्हिंग डेज् सेल’ आजपासून (ता. 12) सुरु झाला आहे. येत्या 16 मार्चपर्यंत हा सेल चालणार आहे. त्यात ग्राहकांना ‘इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स’पासून ते स्मार्टफोन्ससह विविध इलेक्ट्राॅनिक उपकरणे व उत्पादनांवर बंपर सूट मिळणार आहे. नेमक्या कोणत्या उत्पादनांवर किती सूट मिळेल, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Advertisement

‘फ्लिपकार्ट’ सेलबाबत..
‘फ्लिपकार्ट’चा (Flipkart) हा सेल ग्राहकांसाठी लाईव्ह झाला आहे. ‘फ्लिपकार्ट’ प्लस सदस्यांसाठी 24 तास आधीच सेल सुरु झाला असून, अॅक्सिस (Axis) बॅंकेच्या कार्डवर मोठी सुट मिळत आहे. सोबतच कंपनीने ‘एसबीआय’ (SBI) बँकेसोबत करार केला असून, ‘एसबीआय क्रेडिट कार्ड’वर 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे..

कोणत्या वस्तूंवर किती सुट.?
अॅपल (Apple), रिलमी (Realme), पोको (Poco), सॅमसंग (Samsung) सारख्या कंपन्यांच्या फोनवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. शिवाय, स्मार्टवाॅच, फिटनेस बँड सारख्या स्मार्ट वेअरेबल उत्पादनांवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना विविध कंपन्याचे स्मार्टवॉच खरेदी करता येतील. तसेच लॅपटॉपवर 40 टक्के सूट दिली आहे.

Advertisement

‘फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल-2022’मध्ये मोबाईल, टॅब्लेट, कॅमेरा, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन डील्ससह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांसह सर्व गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांना 40 टक्यांपर्यंत सूट मिळत आहे.

दरम्यान, ग्राहकांनी मोबाईल खरेदी केल्यास सेलमध्ये ‘नो कॉस्ट ईएमआय’, ‘बेस्ट एक्सचेंज डील’, ‘फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड’, संपूर्ण मोबाइल प्रोटेक्शन, यांसह अन्य सुविधा मिळणार आहेत.. या सेलमध्ये ग्राहकांना फक्त 299 रुपयांत ‘मोबाईल स्क्रीन केअर प्लॅन’ मिळणार आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement