SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांनो! शेतीत करा ‘हा’ प्रयोग आणि कमवा 3 लाख रुपयांपर्यंत नफा, जाणून घ्या..

जगात सुका मेवा म्हणजे चांगली मिळणारी किंमत आणि शरीरालाही चांगला फायदा देणारे फळ होय. भारताची लोकसंख्या खूप वाढत चालली आहे त्या अंदाजानुसार आपण जर काजूची शेती करून मिळणाऱ्या उत्पादनाला बाजारपेठ शोधून विक्रीमध्येही स्वतःच कष्ट केले तर आपल्याला नफा चांगला येतो. अशा फळबाग शेतीला बाजारभाव जास्त असल्याने यासोबतच फळांच्या पौष्टिकतेकडे पाहून त्याची मागणीही दिवसेंदिवस वाढलेली आहे.

आमच्याकडे नोटा नसल्यानं आमचा पराभव झाला; संजय राऊतांच्या या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं?

Advertisement

अनेक फळबाग मालक आता काजू उत्पादन करत आहेत. काजूच्या भावात कधी जास्त घसरण होत नाही तसेच बदामाच्या बाबतीतीही हे लागू होते. काजू प्रयोग देखील व्यवसाय म्हणून एक उत्तम पर्याय आहे. प्रक्रिया केलेल्या फळाचा ज्युस, पावडर, पदार्थ यांना आज बाजारपेठेत मोठी मागणी आहे. काजू आज मार्केटमध्ये आपणांस सातशे ते आठशे रूपये किलोच्या भावाने मिळतो. भारतात अशा प्रक्रिया केलेल्या काजूला मोठा दर व मागणी आहे.

आपल्या शरीराच्या सुदृढ होण्यामागे काजू-बदामाची मोठी भूमिका असते हे आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रामध्ये प्रमुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड इत्यादी किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये काजूची मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, तसेच महाराष्ट्रातील काजू ला परदेशात फार मोठी मागणी आहे. जर तुम्हाला ही शेती करायची असेल तर सरकार अनुदान देत आहे आणि याबाबत आवश्यक महिती तुम्ही गुगलवरून घेऊ शकता अथवा जवळील इंटरनेट कॅफे मालकाकडे जाऊन योजनांविषयी चौकशी करू शकता.

Advertisement

काजू प्रक्रिया उद्योग: (Cashewnut Processing टेकनॉलॉजी)

काजू बी वर प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला काजूगर मिळतात. काजूगर हे पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. बाजारपेठेत मार्च ते मे या कालावधीत काजू येतात. सर्वसामान्यपणे सुरुवातीला झाडावरून पडलेले काजू गोळा करण्यात येतात. त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन व्यवस्थितपणे साफ केले जातात. चार ते पाच दिवस सुकवण्यासाठी ठेवले जातात. नंतर काजू बी 90 ते 100 सेंटिग्रेड तापमानामध्ये 45 मिनिटे बॉयलरमध्ये उकळून भेटले जातात. तसेच त्यानंतर बिया बारा तास ड्रायरमध्ये सावलीत वाळवतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काजू बी कटर मशीनद्वारे फोडतात व बियांची टरफले काढून त्यांना तब्बल आठ तास ड्रायरमध्ये ठेवतात आणि नंतर काजूगराच्या आकारमानानुसार वर्गीकरण करून त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून बॉक्समध्ये ठेवले जातात.

Advertisement

प्रकल्पाविषयी आधी जाणून घ्या..

काजू उदयोग उभारणीसाठी अंदाजे 1 ते 1.50 लाख रूपये अंदाजे खर्च येतो. काजू उदयोगाकरिता पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य मिळू शकते किंवा स्थानिक बँकेकडून सुध्दा आपणांस कर्ज मिळू शकते. जर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माहिती घेऊन काजू प्रक्रिया उद्योगाचा व्यवस्थित अभ्यास करून व प्रशिक्षण घेऊन जर सुरुवात केली तर चांगल्याप्रकारे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. एक किलो काजू बिया पासून अडीशे तीनशे काजुगर मिळत असल्याने 50 किलो काजू बियांपासून दररोज पंधरा किलो काजू गर मिळू शकतो. 190 रुपये प्रतिकिलो दराने 2850 रुपये उत्पन्न मिळते. जर तुमचं व्यवस्थापन अतिशय योग्य पद्धतीने होणार असेल तर तुम्ही अधिकचेही उत्पादन काढू शकतात. जर आपण विचार केला तर सगळा खर्च वजा जाता वर्षाला अडीच ते तीन लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement