SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला सत्ता..? विधानसभा निवडणुकीत दिग्गजांना धक्का..!

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला छोबीपछाड मिळाल्याचे दिसत आहे.. गोवा वगळता अन्य चार राज्यांमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांवरच विश्वास दाखवला. पंजाबमध्ये काॅंग्रेसला आपला गड राखता आला नाही. येथे अनपेक्षितरित्या ‘आप’ पक्षाने बाजी मारल्याचे चित्र आहे..

देशातील या पाचही राज्यांमधील निवडणुकांचे कल स्पष्ट झाले असून, त्यात सत्ताधारी भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.. या पाचही राज्यांतील निवडणूक निकालाबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

उत्तर प्रदेशमध्ये योगींवर विश्वास
उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू नि योगी आदित्यनाथ यांच्यावरील मतदारांचा विश्वास कायम असल्याचे दिसते. मतमोजणीच्या आतापर्यंत हाती आलेल्या अंदाजांनुसार युपीमध्ये भाजपने 250 हून अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून, त्यांचा सत्ता स्थापन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पक्षनिहाय कल

Advertisement
 • एकूण जागा – 403
 • भाजप –  263
 • समाजवादी पार्टी-  136
 • बसपा – 2
 • काँग्रेस – 1
 • इतर – 1

गोव्यात भाजप आघाडीवर
गोव्यात भाजप व काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपने गोव्यात मुसंडी मारल्याचे दिसते. एकूण 40 जागा असून, बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहे. येथे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ‘किंगमेकर’ ठरण्याची शक्यता आहे.. विशेष म्हणजे, ‘आप’ने गाेव्यातही आपले खाते उघडले आहे..

पक्षनिहाय कल

Advertisement
 • एकूण जागा- 40
 • भाजप – 19
 • काँग्रेस – 13
 • मगोप – 4
 • आप – 1

पंजाबमध्ये ‘आप’ची बल्ले बल्ले
पंजाबमध्ये ‘आप’ सत्तेवर बसणार असल्याचे निश्चित आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर सिंह बादल, प्रकाश बादल, तसेच अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद यांचाही धक्कादायक पराभव झाला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हे रुपनगर व बरनाला अशा दोन्ही ठिकाणी हरले.

पक्षनिहाय कल

Advertisement
 • एकूण जागा – 117
 • आप – 91
 • काँग्रेस- 19
 • अकाली दल – 4
 • भाजप – 2
 • इतर – 1

मणिपुरमध्ये भाजप नंबर वन
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजपने सत्तेसाठी आपला दावा मजबूत केलाय. मणिपूरमध्ये 60 पैकी 30 जागांवर भाजपने आघाडी घेतलीय. त्यामुळे येथे जनता दलानं खातं उघडलं असून, तिपईमुख मतदारसंघातून ​​नंगुसनलूर सानाते विजयी झाले. भाजपचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी हेनगांग मतदारसंघातून विजय झाला..

पक्षनिहाय कल

Advertisement
 • एकूण जागा – 60
 • भाजप -30
 • काँग्रेस – 8
 • एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी)  – 8
 • इतर – 14

उत्तराखंडमध्ये भाजपाला बहुमत
उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत एकूण 70 जागांपैकी भाजपाने तब्बल 48 जागांवर आघाडी घेतली. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, काँग्रेसला 18 जागांवर पुढे आहे. उत्तराखंडमध्ये मिळालेल्या बहुमतामुळे भाजप नेते खूश असून, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे..

पक्षनिहाय कल

Advertisement
 • एकूण जागा – 70
 • भाजप – 48
 • काॅंग्रेस – 18
 • बसपा – 2
 • इतर – 2

 

Advertisement