SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

1 एप्रिलपासून सुट्यांमध्ये होणार मोठा बदल..? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी..!

सुट्टी.. प्रत्येक कामगारासाठी एक हक्काचा दिवस.. कामाचा ताण हलका करणारा दिवस.. आठवड्याचे पाच-सहा दिवस काम केल्यानंतर अनेकांना रविवारी सार्वजनिक सुटी मिळते. हा एक दिवस आनंदात घालवल्यावर कामगार दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जोमाने कामावर हजर होतात..

दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सुटीबाबत एक ‘गुड न्यूज’ मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार कामगार सुधारणा कायदा, अर्थात ‘लेबर लाॅ’ (labor law) या वर्षापासूनच लागू करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या हालचालींना वेग आलाय.

Advertisement

नवीन ‘लेबर कोड’ या वर्षीच लागू झाल्यास, कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. विशेषत: सरकारी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अर्जित रजाची (Earned Leave) संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना वर्षाला 240 अर्जित रजा मिळतात. नवा लेबर कोड लागू झाल्यावर त्यात वाढ होऊन या रजांची संख्या 300 पर्यंत वाढणार असल्याचे सांगितले जाते.

कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, रिटायरमेंट आदी मुद्द्यांवर कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये काही दिवसांपूर्वी चर्चा झाली. त्यात कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा 240 वरून 300 पर्यंत वाढवण्याची मागणी झाली होती.. त्यानुसार, नव्या ‘लेबर कोड’मध्ये बदल केले जाणार असल्याचे समजते..

Advertisement

भारतात 29 केंद्रीय कामगार कायदे 4 कोडमध्ये विभागले आहेत. त्यात वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध, व्यवसाय सुरक्षा, आरोग्य व कामाची परिस्थिती आदींचा समावेश आहे. आतापर्यंत 13 राज्यांनी या कायद्यांचा मसुदा तयार केला आहे.

संसदेने हे 4 लेबर कोड संमत केले असले, तरी राज्यांनीही हे नियम अधिसूचित करायला हवेत. त्यानंतर हे नियम राज्यांमध्ये लागू होतील. केंद्र सरकारला नव्या लेबर कोडची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून करायची होती. परंतु राज्यांची तयारी पूर्ण न झाल्यामुळे ही अंमलबजावणी पुढे ढकलली होती, असे सांगण्यात आले..

Advertisement

केंद्रिय मंत्री काय म्हणाले..?
याबाबत केंद्रीय कामगार व रोजगार खात्याचे राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “नवा कामगार कायदा लागू करण्यापूर्वी आम्ही प्रत्येक राज्याच्या प्रतिनिधींसोबत सातत्याने बोलत आहोत. बहुतेक राज्यांनी त्यासाठी तयारी दर्शवली असून, ते नवीन मसुदा नियम बनवत आहेत.”

“काही राज्ये नव्या कायद्याबाबत विचार करीत आहेत. कोणतीही मोठी योजना किंवा प्रोग्राम आल्यास सर्वांना सोबत घेऊन तो राबविणार आहोत. नवीन लेबर कोड लागू करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत ठरलेली नाही, परंतु 2022 मध्ये नवीन चार लेबर कोड लागू होतील अशी अपेक्षा आहे..” असे तेली म्हणाले..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement