SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या.? ‘या’ दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का..!

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (गुरुवारी) जाहीर झाले. या निकालांतून देशावर आजही भाजपचे राजकीय वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, गोवा नि मणिपूरमध्ये भाजपने एकहाती आपली सत्ता राखलीय..

भाजपचा विजयरथ जोरात धावत असताना, काॅंग्रेसची पिछेहाट धक्कादायक ठरली.. काॅंग्रेसला आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पंजाबमध्येही सत्ता राखण्यात अपयश आले. आम आदमी पक्षाने (आप) पंजाबमध्ये जोरदार मुसंडी मारताना विरोधी काॅंग्रेससह भाजप व अकाली दलाचा सुपडा साफ केला.

Advertisement

दिग्गजांचा पराभव
विधानसभा निवडणुकीत दोन विद्यमान आणि पाच माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला. त्यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे पराभूत झाले..

पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल, अमरिंदर सिंग आणि राजिंदर कौर भट्टल या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह नवज्योतसिंह सिद्धूच्याही पदरी अपयश आले. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत, तसेच गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव हेही पराभूत झाले.

Advertisement

युपीमध्ये ‘योगी मॅजिक’
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जादू पुन्हा चालली. योगी यांच्या मॅजिकपुढे काँग्रेससह बसपाची दयनीय अवस्था झाली. या दोन्ही पक्षांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने फाईट देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा लढा तोकडा पडला.. भाजपला सत्तास्थापनेपासून ते राेखू शकले नाहीत.

पक्षानिहाय बलाबल
– भाजप – 255 (विजयी- 145, लिडवर -110)
– सपा – 111 (विजयी- 56, लिडवर -55)
– बसपा – 1
– काॅंग्रेस – 2

Advertisement

गोव्यात भाजपच किंग
गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट दिसतंय. गोव्यात बहुमतासाठी 21 सदस्य हवे आहेत. सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून, त्यांना बहुमतासाठी दोन जागांची गरज आहे. मात्र, त्याआधीच तीन अपक्षांनी भाजपला समर्थन दिलयं. अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशीही भाजपची बोलणी सुरु आहे.. गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येते..

पक्षानिहाय बलाबल
– भाजप – 20
– काॅंग्रेस – 11 (विजयी – 10, लिडवर – 1)
– आप – 2
– मगोप – 2
– इतर – 5

Advertisement

पंजाबमध्ये आपची त्सुनामी
पंजाबमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची (आप) त्सुनामी आली. आपने सत्ताधारी काँग्रेससह भाजपलाही नामोहरण केले. विशेष म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांचा पराभव झालाय.

पक्षानिहाय बलाबल
– आप – 92 (विजयी – 91, लिडवर – 1)
– काॅंग्रेस – 18
– अकाली दल – 3
– भाजप – 2
– इतर – 2 (सर्व विजयी)

Advertisement

उत्तराखंडमध्ये भाजपचे वर्चस्व
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा धक्कादायक पराभव झाला. भाजपने सर्व पक्षांना पिछाडीवर टाकत 47 जागांवर आघाडी घेतलीय.आपला उत्तराखंडमध्ये खातेही उघडता आले नाही.

पक्षानिहाय बलाबल
– भाजप – 47 (विजयी – 38, लिडवर – 9)
– काॅंग्रेस – 19 (विजयी – 16, लिडवर – 3)
– इतर – 4 (विजयी – 2, लिडवर – 2)

Advertisement

मणिपूरमध्ये सबकुछ भाजप
मणिपूरमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस 28 जागा जिंकून सर्वात मोठी पक्ष ठरला होता. मात्र, भाजपने काॅंग्रेसचे काही आमदार फोडून सत्ता मिळवली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांना कोणतीही संधी दिलेली नाही. भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे.

पक्षानिहाय बलाबल
– एकूण जागा 60
– भाजप- 32 (विजयी – 27, लिडवर – 5)
– काँग्रेस – 5
– एनपीपी – 7 (विजयी – 6, लिडवर -1)
– एनपीएफ – 5

Advertisement

दरम्यान, आजच्या 5 राज्यांच्या ताज्या निकालांतून तीन प्रमुख निष्कर्ष समोर आले. ते म्हणजे, भाजपचा राजकीय दबदबा कायम, कॉंग्रेसची राजकीय घसरण सुरूच नि ‘आप’मुळे देशाच्या राजकीय नकाशात बदलाची शक्‍यता..

उत्तरेकडील या 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे दोन वर्षांनी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. या निवडणुकांचे निकाल पाहता, देशपातळीवर भाजपशी दोन हात करण्यासाठी विरोधकांना आपली ताकद आणखी वाढवावी लागणार असल्याचेच म्हणावे लागेल.

Advertisement