SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जुना टीव्ही देऊन नवीन घ्या, अ‍ॅमेझॉनवर दणकेबाज ऑफर्सचा ‘असा’ घ्या फायदा..

ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना सध्या अ‍ॅमेझॉननं टीव्ही अपग्रेड डेज सेलची (Amazon TV Upgrade Days Sale) घोषणा करत मोठी खुशखबर दिली आहे. कारण ग्राहकांना या सेलमध्ये बऱ्याच कंपन्या चांगल्या आणि सोबतच तुमच्या खिशाला परवडणाऱ्या ऑफर्स देत आहे. यात स्मार्ट अनेक टीव्ही मॉडेल्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे.

आपण आजकाल बघतो की विविध कंपन्या आता नवीन असतात आणि मोठ्या ब्रँड कंपन्यांना त्या तोडीस तोड टक्कर देतात. याचाच अर्थ असा की तंत्रज्ञान जवळजवळ सारखं असणं आणि फीचर्सही भरपूर देणं हा होय. सध्या यामध्ये वनप्लस, वेस्टिंगहाउस, एलजी आणि सॅमसंगसह (Oneplus, Westinghouse, LG, Samsung) अशा अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.

Advertisement

Westinghouse 43 inch Smart TV येतोय स्वस्त!

अ‍ॅमेझॉनवरील हा सेल येत्या 3 दिवसांमध्ये संपणार असून 13 मार्चपर्यंत चालू राहणार आहे. या सेलमध्ये असणाऱ्या Westinghouse कंपनीची एक ऑफर म्हणजे 43-इंचाची स्मार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत ही कंपनी देत आहे. Westinghouse 43 inch TV भारतात 29,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. अ‍ॅमेझॉनवर या सेलमध्ये तो फक्त 20,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला खरेदी करायचा असेल, तर सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता. या टीव्हीवर 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

Advertisement

तसेच तुम्ही जर जुना टिव्ही देऊन हा नवीन टीव्ही घेतला, तर एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्ही आणखी बचत करू शकता. Westinghouse कंपनीच्या या टीव्हीच्या या मॉडेलवर 4,080 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर कंपनीने दिली आहे. त्यामुळे 30 हजारांचा हा टीव्ही तुम्ही फक्त 15,420 रुपयांमध्ये घरी आणू शकता. फक्त लक्षात असू द्या की काही लोकेशन्स ला एक्स्चेंज ऑफरचा लाभ घेता येत नसला तरी या किंवा इतर कंपनीचे टीव्ही आहेत त्या ऑफरही तुम्ही Amazon App वर पाहू शकता.

Westinghouse 43 inch Smart TV चे स्पेसिफिकेशन्स वाचा..

Advertisement

▪️ Full HD रिजोल्यूशन असलेला 43 इंचाचा पॅनल
▪️ 60Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट, यात 178 डिग्री व्ह्यूईंग अँगल
▪️ कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट
▪️ 30W चे स्पिकर्स-क्रिस्टल क्लियर साऊंड क्वॉलिटी
▪️ गुगल व्हॉईस असिस्टंस सपोर्ट
▪️ Android 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टम
▪️ YouTube, Prime Video, Hotstar, Zee5, SonyLiv आणि अन्य अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स
▪️ हा टीव्ही डिस्प्ले मिररिंगला सपोर्ट करतो.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement