SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्होडाफोन-आयडियाचा भन्नाट रिचार्ज प्लॅन! ग्राहकांना ‘या’ गोष्टी अनलिमिटेड मिळणार..

टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) उर्फ ​​Vi कडे बजेटमध्ये असणारे अनेक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये vi चे सिम कार्ड असेल, जर तुम्ही वोडाफोन कंपनीचे प्रीपेड ग्राहक असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला जास्त दिवस वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर वाचकांनो आम्ही तुम्हाला एका अतिशय मस्त प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत.

कंपनीचा हा प्लॅन 180 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत आला आहे. यासोबरच कंपनीच्या या प्लॅनमध्ये देशातील ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट डेटा, दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग, Binge ऑल नाईट सारख्या भरपूर सुविधा मिळत आहेत. तर मग प्‍लॅनच्‍या किंमती आणि जबरदस्त फायद्यांविषयी जाणून घेऊ..

Advertisement

▪️ Vodafone Idea च्या 1449 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB इंटरनेट डेटा मिळतो . ग्राहकांना इतर सर्व कंपन्यांच्या नेटवर्क्सवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यामध्ये तुम्ही कोणाशीही हवे तितके तास स्मार्टफोनवर बोलू शकणार आहेत.

▪️ Vi Movies and TV अ‍ॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स अंतर्गत दर महिन्याला 2 जीबीपर्यंत डेटाचा फायदा मिळतो.

Advertisement

▪️ सोबतच, Binge All Night अंतर्गत व्होडाफोन वापरकर्ते रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा घेऊ शकतात.

वोडाफोन आयडियाचा 901 रुपये किंमतीचा प्लॅन आणि फायदे :

Advertisement

वोडाफोन आयडियाच्या 3 जीबी डेटा दररोज आणि 48 जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळेल. भारतातील सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग व दररोज 100 मोफत एसएमएसचा (100 Free SMS) देखील फायदा या प्लानमध्ये मिळतो. हा प्लान 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्सचा फायदा मिळतो. तसेच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement