SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

झुंड चित्रपटावर होणाऱ्या टिकांवर नागराज मंजुळेंनी दिलं उत्तर, म्हणाले ‘असं’ काही..

राज्यात नव्हे तर देशात अल्पावधीतच प्रसिद्ध झालेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘झुंड’ (Zund Movie) या चर्चेत असणाऱ्या चित्रपटाला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

अमिताभ बच्चन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू व इतर काही कलाकारांच्या भूमिका असलेला आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘झुंड’ या कौतुकास पात्र ठरत आहे. असे असले तरी काही व्यक्तींनी यावर अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे टिप्पण्या केल्या आहेत. दरम्यान नुकतंच नागराज मंजुळे यांनी या टीकांवर आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

Advertisement

महाराष्ट्रात नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला असून समाजाचे दुहेरी वास्तव यामध्ये दाखवले आहेत. खेड्यांमधील अनेक गोष्टी चित्रपटातून सादर करणाऱ्या नागराज मंजुळे यांनी यावेळी वेगळेपण दाखवलं आहे. एकक मोठ्या मुद्द्यात हात घालत त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. एकीकडे वाह वा! तर दुसरीकडे याच्या या चित्रपटावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीका सुध्दा होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या एका मुलाखतीत त्यांनी झुंड चित्रपटाबद्दल आणि वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या या चित्रपटातील कलाकारांबदल काही गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी या चित्रपटावर होणाऱ्या टीकेबद्दलही प्रत्युत्तर दिले. त्यांनी असेही सांगितले की टीका करणाऱ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून उत्तरही मिळाले आहे.

Advertisement

नागराज मंजुळे म्हणाले, “सोशल मीडिया हे माध्यम मला मशिनसारखे वाटते. त्याला डोकं नसतं. चेहरा नसतो. त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या टीकांना मी गांभीर्याने घेत नाही. जर एखाद्या व्यक्तीला या चित्रपटाबाबत तक्रार करायची असेल तर त्याने माझ्यासमोर येऊन करावी. सोशल मीडियावर अनेक जण काही ना काही तक्रार करतात. या चित्रपटात जर काही चुका असतील आणि त्या जर तुम्ही मला प्रत्यक्ष सांगितल्या तर तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे हे माझ्या लक्षात येईल”, असेही नागराज मंजुळे म्हणाले.

“मला जे काही सांगायचे होते ते मी ‘झुंड’ मधून सांगितले आहे. आता त्याला वेगळी पुरवणी जोडायची काय गरज? असा प्रश्न नागराज यांनी यावेळी विचारला. आपण एकमेकांना प्रेमाचा हात देऊन पुढे जावे. त्यांना मागे ओढू नये, हाच माझ्या चित्रपटाचा हेतू आहे”, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, ‘झुंड’ या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर फक्त 3 दिवसांतच 6.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Zund movie box office collection) 1.50 कोटी रुपयांची, गेल्या शनिवारी 2. 10 कोटी आणि रविवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे चित्रपट लवकरच 10 कोटींच्या असपास पोहोचणार की काय असंच दिसत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement