SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फ्लिपकार्ट’ने मागितली महिलांची माफी, महिला दिनी केली ‘अशी’ माेठी घोडचूक..!

8 मार्च.. जागतिक महिला दिन.. महिलांनी स्वत:च्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा खास दिवस.. जगभरात काल (मंगळवारी) मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा झाला. सोशल मीडियातून महिलांचे गोडवे गाण्यात आले. महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला..

‘फ्लिपकार्ट’ (Flipkart) या प्रसिद्ध ई-काॅमर्स कंपनीनेही महिलांना अशाच प्रकारे हटके शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न चांगलाच अंगलट आला.. सोशल मीडियातूनच टीकेची झोड उठल्यावर अखेर ‘फ्लिपकार्ट’ने महिलांची जाहीर माफी मागितली.. मात्र, नेमकं हे प्रकरण काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं काय घडलं..?
जागतिक महिला दिनानिमित्त ‘फ्लिपकार्ट’ने महिलांसाठी खास ऑफर जाहीर केल्या होत्या. त्यासाठी महिला दिनाच्या आदल्या दिवसापासूनच अनेकांच्या मोबाईलवर काही प्रमोशनल मेसेज पाठवले होते. या मेसेजमध्ये असं म्हटलं होतं, की “प्रिय ग्राहक, चला हा महिला दिन साजरा करू या… 299 रुपयांपासून ‘किचन अप्लायेन्स’ उपलब्ध…!”

Advertisement

दरम्यान, एका युजर्सने ‘फ्लिपकार्ट’च्या या मेसेजचा ‘स्क्रिनशाॅट’ सोशल मीडियावर शेअर केला व ‘तुम्हाला या मेसेजमध्ये काही समस्या असल्याचं दिसतंय का..?’ अशी विचारणा केली. काही वेळातच त्यावर कमेंट सुरु झाल्या. स्वयंपाकघर हे महिलांसाठीच आहे, असा लैंगिक भेदभाव करणारा संदेश ‘फ्लिपकार्ट’च्या मेसेजमधून दिल्याचा आरोप महिलांनी केला.

एका युजर्सनं असं म्हटलं की, ‘अप्लायन्स, मेकअप आणि पिंक प्राॅडक्टबाबतही असंच केलं जातं. महिला सशक्तीकरणाबाबत आपण बोलतो, पण अद्याप महिला स्वयंपाकघरापुरतीचं मर्यादित असल्याच्या समजुतीत जगत आहोत…” दरम्यान, ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यावर ‘फ्लिपकार्ट’वर टीकेची झोड उठली.

Advertisement

‘फ्लिपकार्ट’चा माफीनामा
‘फ्लिपकार्ट’च्या ‘एसएमएस’चे आणखी काही ‘स्क्रिनशॉट’ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. ते इतके व्हायरल झाले, की अखेर ‘फ्लिपकार्ट’ला या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. अखेर ‘फ्लिपकार्ट’ने सोशल मीडियावर सपशेल माफी मागितली.

Advertisement

महिला दिनादिवशीच ‘फ्लिपकार्ट’ने माफी मागणारं ट्विट केलं. “आम्ही घोळ घातला नि त्यासाठी आम्ही माफी मागतो… कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नव्हता. महिला दिनी आम्ही पाठवलेल्या मेसेजसाठी आम्ही माफी मागतो..” असं ट्विट करीत ‘फ्लिपकार्ट’नं जाहीर माफी मागितली.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement