SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रिकेटच्या नियमांत मोठे बदल, फलंदाजांना आता ‘या’ पद्धतीने बाद करता येणार…!

साल होतं 2019.. ‘आयपीएल’चा बारावा हंगाम.. किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान राॅयल्समधील सामना रंगात आला हाेता. राजस्थानकडून खेळणारा सलामीवीर जोस बटलर तुफान फलंदाजी करीत होता. सामन्याची 13 वी ओव्हर टाकण्यासाठी पंजाबकडून खेळणारा आर. अश्विन सज्ज झाला.. त्यावेळी बटलर ‘नाॅन स्ट्रायकर एंड’ला उभा होता.

अश्विन बाॅल टाकण्यासाठी सरसावला नि बटलर दोन पावले पुढे गेला. अश्विनने संधी साधली.. बाॅल टाकण्याऐवजी बटलरला ‘रन आउट’ (मंकडिंग) केले. ‘आयपीएल’च्या इतिहासात अशा प्रकारे बाद होणारा बटलर पहिलाच खेळाडू ठरला.. मात्र, खेळ भावनेच्या विरोधात कृती केल्याने अश्विनवर जगभरातील खेळाडू, तज्ज्ञांनी टीका केली..

Advertisement

हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे, पुन्हा एकदा हा ‘मंकडिंग’चा मुद्दा समोर आला आहे. अश्विनने केलेली कृती बरोबरच होती नि खेळभावनेच्या नावाखाली क्रिकेटमध्ये बॅटर्सना फायदा देता येणार नसल्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यासाठी क्रिकेट खेळातील नियमांत काही बदल केले आहेत.

‘मेलबर्न क्रिकेट क्लब’कडून क्रिकेटबाबतचे नियम तयार केले जातात. या संस्थेनं ‘मंकडिंग’सह इतर नव्या नियमांना मान्यता दिली आहे. त्यानुसार आता एखाद्या बॅटरला ‘मंकडिंग’ पद्धतीनं आऊट केल्यास, ते खेळभावनेच्या विरोधात मानले जाणार नाही.

Advertisement

येत्या 1 ऑक्टोबर 2022 पासून या नियमाची काटेकाेर अमंलबजावणी होणार आहे. त्यामुळे बाॅलरने बॉल टाकण्यापूर्वीच ‘नॉन स्ट्रायकर’ला असणाऱ्या फलंदाजांना क्रिझ सोडताना हजार वेळा विचार करावा लागणार आहे.

आणखी एक बदल..
क्रिकेटच्या नियम क्रमांक 18.11 मध्येही ‘एमसीसी’ने बदल केलाय. त्यानुसार एखादा फलंदाज झेलबाद झाला नि कॅच घेण्यापूर्वी दोन्ही फलंदाजांनी रन काढताना स्ट्राईक बदलली, तरी फरक पडणार नाही. नवा फलंदाजच स्टाईकवर राहिल. मात्र, ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फलंदाज कॅच आऊट झाल्यास हा नियम लागू नसेल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (ECB) ‘द हंड्रेड’ लीगमध्ये या नियमाची अंमलबजावणी केली होती.

Advertisement

बाॅलला लाळ लावण्यास बंदी
‘एमसीसी’ने बॉलला लाळ किंवा घाम लावण्यावर बंदी घातलीय. कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा नियम लागू केला होता. ‘एमसीसी’ने आता त्याला कायमस्वरूपी मान्यता दिलीय. या प्रकारामुळे खेळात बदल करण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला जात असल्याचे ‘एमसीसी’चे म्हणणे आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement