SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): व्यावसायिकां साठी निराशेचा दिवस असू शकतो. आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा.

वृषभ (Taurus): नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे भन्नाट करण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील. मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही.

मिथुन (Gemini) : नोकरी करणार्‍या लोकांसाठी दिवस आरामशीर असेल. नातेवाईक व मित्रांशी सौहार्दाचे संबंध असतील. नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. वायफळ खर्च होईल. काही शारीरिक त्रासही संभवतात.

Advertisementकर्क (Cancer) : आई-वडिलांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेम संबंधा साठी चांगला दिवस आहे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल. मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल.

सिंह (Leo) : नोकरी करणारे लोकं अथक मेहनतीने वरीष्ठ लोकांना समाधानी करू शकतात. उत्पन्नात वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल.

कन्या (Virgo) : नवनवीन संधी प्राप्त होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल. मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा. आर्थिक स्थिती ठिक राहिल.

Advertisementतुळ (Libra) : संसाधन कमतरतेमुळे काही व्यावसायिक योजना स्थगित कराव्या लागू शकतात. आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल. अंग मेहनतीला मागे हटु नका.

वृश्‍चिक (Scorpio) : तुम्ही मेहनत करण्याच्या स्थितीत असाल. तूम्हाला वेळेत काम पूर्ण होण्यापासून मागे खेचेल. काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

धनु (Sagittarius) : वरीष्ठ लोकांना खुश करणे थोडे कठीण जाईल. कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. मन थोडं तणावयुक्त राहिल.

Advertisementमकर (Capricorn) : हाडे व किडनी संबंधी आजाराशी लढणार्‍या लोकांसाठी हा कठीण काळ आसेल. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत. कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल.

कुंभ (Aquarious) : वरिष्ठ नागरिकांनी भावनात्मक भागीदारी व लांबची यात्रा करू नये. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे. अनेक विचारांमध्ये व्यस्त असाल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबासमवेत गोड जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील.

मीन (Pisces) : कुटुंबातील अशांती तुमच्या काळजीचे कारण असू शकते. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाच वातावरण असेल. वडिलांचा आशिर्वाद मिळेल. सरकारी काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. राजकारणाशी संबंधित लोकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल.

Advertisement