SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत ‘ही’ धक्कादायक माहीती आली समोर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय, वाचा..

क्रिकेट च्या दुनियेतील महान गोलंदाजांपैकी एक ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेट खेळाडूचा मृत्यू झाला. एक फिरकीपटू म्हणून आपली कारकीर्द गाजवणाऱ्या शेन वॉर्नच्या अचानक जाण्यानं अनेकांना धक्का बसला आहे. शेन वॉर्नचा मृत्यू हार्ट अटॅकनं असल्याचा समोर आलं आहे. थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नचा मृत्यू (Shane Warne News) हा नैसर्गिक कारणामुळे झाल्याचं स्पष्ट केले आहे, परंतु काही जण यावर संशय व्यक्त करत आहे.

पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याठिकाणचे (व्हीला) (Shane Warne Villa) मृत्युपूर्वीचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या फुटेजमध्ये नवीन बाबी उघड झाल्या आहेत. शेन वॉर्नने मसाज करण्यासाठी 4 महिलांना बोलावलं असल्याची माहीती आहे. प्राथमिक अंदाज आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अशी माहीती आहे की, हार्ट अटॅकपूर्वी (Heart Attack) शेन वॉर्न मसाज करण्यासाठी या महिलांच्या संपर्कात आला होता. मग तेव्हा शुक्रवारी दुपारी 1 वाजून 53 मिनिटांनी या महिला त्याच्याकडे मसाज करण्यासाठी येताना दिसतात.

Advertisement

सीसीटीव्ही कॅमेऱ्यानुसार, या महिलांपैकी 2 जणी शेन वॉर्नच्या खोलीत जातात तर इतर दोघी दुसऱ्या खोलीत जाताना दिसतात. बाहेर पडताना या सर्व महिला दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी शेन वॉर्नच्या रूममधून बाहेर पडतात. मग काही वेळ गेल्यानंतर 2 तास 17 मिनिटांनी म्हणजे 5.15 वाजता क्रिकेटर शेन वॉर्न पहिल्यांदा बेशुद्ध अवस्थेत रूममध्ये पडल्याचं दिसून येतो आणि त्यानंतर तो उठतच नसल्याचं कळालं.

थायलंडमधील पोलिसांच्या माहितीनुसार, शेन वॉर्नच्या मृतदेहाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट त्यांच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दुतावासाला पाठवला आहे. शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनाही त्याच्या मृत्यूविषयी कोणावरही कुठलाही संशय नाही. तर शेन वॉर्नच्या शरीरावर कुठल्याही खूणा नव्हत्या किंवा तेथील इतर सामान गायब झाल्याचंही दिसून आलं नाही. तसेच, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शेन वॉर्नचा मृत्यू (Shane Warne Death Reason) नैसर्गिक कारणामुळेचं झाल्याचं सांगितले आहे. अशी माहिती थायलंडमधील सहाय्यक पोलीस आयुक्त जनरल सुराचेत हाकपार्न यांनी दिली आहे.

Advertisement

वॉर्नच्या मॅनेजरने केला ‘हा’ खुलासा..

दरम्यान, सेलेब्रिटी, खेळाडू यांना फिटनेससाठी ठरवलेला डायट फॉलो करावा लागतो. मॅनेजरकडे अशीही माहीती आहे की, शेन वॉर्न सुट्टीवर जाण्याच्या आधी 2 आठवडे लिक्विड डायटवर होता. शेन वॉर्नच्या त्याच्या छातीत वेदना आणि अंगावर घाम येत असल्याची तक्रार होती. तो अनेक वर्षांपासून सिगारेट असल्याचं कळतंय, यामुळेच त्याला ह्द्रयविकाराचा झटका आला असणार, असा प्राथमिक अंदाज वॉर्नच्या मॅनेजरने खुलासा करत व्यक्त केला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement