SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चिंताजनक! आता रशियाने शत्रू देशांची यादी केली जाहीर, यादीत ‘या’ बलाढ्य देशांचा समावेश..

रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine Conflict) मध्ये युद्ध सुरू असल्याची चर्चा आता खेडोपाड्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. सध्या रशियाने तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा केली असली तरी हे युद्ध केव्हा थांबणार ही चिंता आता भारतासह इतर देशांनाही आहे. कोणी प्रत्यक्षपणे युक्रेनला मदत करून तर काही अप्रत्यक्षपणे रशियाला साथ देणारे देश आहेत.

अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी अर्थव्यवस्थेला धक्का देण्यासाठी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. आता आणखी चिंताजनक गोष्ट अशी की, रशियाकडून त्यांच्या शत्रू देशांची यादी (Enemies list of Russia) जाहीर करण्यात आली आहे. यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. असे असले तरी एवढे मोठे आव्हान रशिया स्वतःच्या हाताने उभं करणे मूर्खाचे ठरेल आणि ते पेलवणार देखील नाही.

Advertisement

सविस्तर बातमी वाचा..

युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू करून आता आपली दहशत वाढण्याच्या प्रयत्नात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या शत्रू देशांच्या यादीला मंजुरी दिली आहे. या यादीमध्ये अमेरिका, ब्रिटन, युक्रेन, जपान आणि युरोपीय संघातील सदस्य देशांची नावे आहेत. युरोपियन युनियनमध्ये एकूण 27 देश आहेत.

Advertisement

रशियाने मंजुरी दिलेल्या या यादीत अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनसह वेगवेगळ्या 31 देशांचा समावेश आहे, असा दावा चीनच्या सरकारी मीडियाने हा दावा केलाय. जर असे असेल, तर ही धक्कादायक बाब असू शकते. चीनमधील CGTN ने आपल्या अहवालात दावा केला आहे. रशियन सरकारने शत्रू देशांच्या यादीला मान्यता दिली असल्याचं समजतंय.

शत्रूंच्या यादीत कोणत्या देशांची नावे?

Advertisement

1. अमेरिका : अमेरिकेने रशियावर बरेच निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या प्रवेशावर बंदी आणि रशियाच्या 4 बँका आणि राज्य ऊर्जा कंपनी गॅझप्रॉमवरही बंदी घातली आहे. अमेरिकेने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्दही बंद केली आहे.

2. ब्रिटन : ब्रिटनने हवाई क्षेत्रासह, 5 रशियन बँकांवर बंदी घातली आहे. रशियाच्या अब्जाधीशांनीही खासगी जेट विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. अमेरिकेप्रमाणेच ब्रिटननेही युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली आहे.

Advertisement

3. युक्रेन : रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले असता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तर युक्रेनला वेगळा देश मानत नाही, असेही म्हटले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाने आपले 500 सैनिक गमावल्याचे मान्य केले आहे.

4. जपान : रशियाविरुद्ध लढण्यासाठी जपान युक्रेनला शस्त्रे पुरवत आहे. मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की ते बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, तंबू, जनरेटर, फूड पॅकेट, हिवाळी कपडे आणि औषधे युक्रेनला पाठवत आहेत. याशिवाय जपानने 4 रशियन बँकांची मालमत्ता जप्त करण्याची घोषणा केली आहे.

Advertisement

5. युरोपियन युनियन : रशियावर अनेक निर्बंध लादणाऱ्या युरोपियन युनियनमध्ये 27 देश आहेत. युरोपियन युनियनच्या सर्व सदस्यांनी त्यांची हवाई हद्द रशियन विमानांसाठी बंद केली आणि युरोपियन युनियनमध्ये उपस्थित असलेल्या रशियन अब्जाधीशांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे. युरोपियन युनियनमधील देश युक्रेनला केवळ आर्थिकच नव्हे तर लष्करीही मदत करत आहेत.

युरोपियन युनियनमधील देश – फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, लॅटव्हिया, लिथुनिया, लक्झमबर्ग, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, माल्टा, नेदरलँडस, पोलंड.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement