SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फिचर फोनद्वारे ऑनलाईन पेमेंट करता येणार, ‘आरबीआय’कडून खास ‘युपीआय’ सेवा लाॅंच..!

पैसे काढण्यासाठी वा भरण्यासाठी पूर्वी बॅंकांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळत.. मात्र, आता हे चित्र कमी झाले आहे. हातात स्मार्टफोन आल्यापासून नागरिकही अधिक स्मार्ट झाले आहेत. ‘युपीआय’ पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून आता एका क्लिकवर एकमेकांच्या खात्यावर अगदी सहज पैसे पाठवता येतात.

मोदी सरकारही डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक लोकांकडे स्मार्टफोन नाहीत. एका आकडेवारीनुसार, भारतात सुमारे 40 कोटी असे लोक आहेत, जे आजही ‘फीचर फोन’च वापरतात.. त्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाईन व्यवहार करण्यात अडचणी येतात.. ही बाब लक्षात घेऊन मोदी सरकारने आज एक पाऊल पुढे टाकले आहे.

Advertisement

‘युपीआय’ सेवा लाॅंच..!
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी खास ‘युपीआय’ सेवा सुरु केलीय.. ‘UPI 123PAY’ असं या नव्या सेवेचं नाव आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, अशा नागरिकांना अगदी त्यांच्या फिचर फोनमध्येही ही सेवा मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही ‘डिजिटल पेमेंट नेटवर्क’ वाढण्यास मदत होणार आहे.

‘आरबीआय’ गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी (ता. 8) ही नवी सेवा लॉंच केली. त्यामुळे स्मार्टफोन नसला, तरी जुन्या पद्धतीचा ‘फीचर फोन’ असणाऱ्या नागरिकांनाही या नव्या सेवेद्वारे पेमेंट करता येणार आहे. ‘युपीआय पेमेंट’ करताना काही अडचण येऊ नये, यासाठी 24 तास ‘हेल्पलाईन’ सेवाही सुरु करण्यात आलीय. समाजातील वंचित घटक, विशेषतः ग्रामीण भागातील लोकही या ‘युपीआय’ सेवेचा वापर करू शकतील, असे शक्तीकांत दास म्हणाले.

Advertisement

‘फीचर फोन’ म्हणजे..
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ‘फीचर फोन’चा वापर होतो.. या फोनमध्ये केवळ ‘कॉलिंग’ नि मेसेजिंगची सुविधा असते. स्मार्टफोनप्रमाणे त्यात अ‍ॅप डाऊनलोड करता येत नाही. पण, आता या फोनमध्ये ‘UPI123PAY’ वापरता येणार आहे. स्मार्टफोनप्रमाणे या फोनद्वारे डिजिटल पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement