SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘कपील शर्मा शो’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, नेटिझन्सकडून ‘शो’वर बंदी घालण्याची मागणी..!

छोट्या पडद्यावरील स्टार कपील शर्मा नि वादाचे नाते तसे जूनेच.. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन कपील शर्मा नेहमीच वादात सापडलाय.. त्यामुळे मधल्या काही काळात तो छोट्या पडद्यापासून दूर गेला होता. मोठ्या डिप्रेशनचा सामना त्याला करावा लागला.. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.

मात्र, आता प्रसिद्ध कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’च वादात सापडला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिलवर विविध आरोप केले असून, त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘नेटिझन्स’ चांगलेच संतापले आहेत. हा वाद इतका विकोपाला गेलाय, की ट्विटरवर सध्या #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिगमध्ये आहे.

Advertisement

नेमकं काय घडलं..?
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री लवकरच ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा घेऊन येत आहेत.. एका युजरने ट्विटरवर ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रमाेशन ‘द कपिल शर्मा शो’मध्ये व्हायला हवं, असं ट्वीट केलं होतं. त्यात युजरने कपिलसाठी असंही लिहिले, की ‘कपिल, तू सगळ्यांनाच मदत केलीस, कृपया या सिनेमाचंही प्रमोशन कर…!’

Advertisement

युजरच्या या ट्विटवर विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलं.. ते म्हणाले, की कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिलाय. या सिनेमात कोणतेही मोठे स्टार नाहीत. त्यामुळे कपिलने चित्रपटाच्या टीमला त्याच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिल्याचा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे.

पुढे ते म्हणतात, की “कपिलच्या शोमध्ये कोणाला आमंत्रित करावं, हे मी ठरवू शकत नाही. त्यांनी कोणाला आमंत्रित करावं, ही त्याची आणि निर्मात्याची इच्छा आहे. मिस्टर बच्चन यांनी म्हटलं, तेच मी म्हणेन, ‘तो राजा आहे, आम्ही रंक..!” दरम्यान, याबाबत कपील शर्मा अथवा त्याच्या बाजूने कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही..

Advertisement

नेटिझन्स संतापले…
दरम्यान, या ट्वीटनंतर कपील शर्मा व त्याचा शो नेटिझन्सच्या निशाण्यावर आले.. ‘द कपील शर्मा’ या शोवर बंदी घालण्याची मागणी सोशल मीडियावर ट्रेंड झाली. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार व त्या मागचं सत्य समोर येण्याची भीती असल्यानेच कपिल शर्मा या टीमला बोलवत नसल्याचा आरोप काही युझर्सनी केला आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement