SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांनो! बांबूच्या शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवायचंय? मग सविस्तर जाणून घ्या..

भारत देश बांबूच्या विविधतेच्या बाबतीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ईशान्येकडील राज्यांना बांबूचे भांडार म्हणतात. बांबू हे पीकभारतातील दहा दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रावर घेतले जाते. भारताचा विचार केला तर बांबूची लागवड क्षेत्र जवजवळ 13 टक्के आहे. तसं पाहिलं तर आपल्याकडे बांबूची शेती ही लागवडीयोग्य जमीन नाही त्यामध्येच करतात किंवा काही ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या ही बांबूची शेती (Agri News) केली जाते.

महाराष्ट्रात बांबूच्या नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या 6 जाती आहेत. त्यातल्या मेस आणि माणगा या जाती मूळच्या कोकण आणि सह्याद्रीतील आहेत. त्यासोबतच परिबास ही जात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आढळते. काटे कळक आणि काष्टी या दोन जाती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळतात.

Advertisement

महाराष्ट्र मध्ये आठ ते दहा जातीच्या बांबूची व्यावसायिक तत्त्वावर लागवड करता येते. त्यासाठी पावसाळा सोडता सहा ते आठ महिने पाण्याची व्यवस्था, जमिनीचा पोत, पर्जन्यमान, जमिनीवर असलेली इतर झाडे तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बांबू विक्री साठी आवश्यक असणारी बाजारपेठ यांची गरज आहे.

▪️ बांबूची एकरी उत्पन्न व लागवड: बांबू चे एक एकर जमिनीत अंदाजे 45 हजार ते 1 लाख प्रती वर्ष एवढे उत्पन्न येऊ शकते. काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळल्या तर यापेक्षाही जास्त उत्पन्न घेणे शक्‍य आहे. बांबूची लागवड रोपापासून किंवा खुंटापासून करता येते. बोअरवेल असेल तर बांबू ठिबक सिंचन करूनही लावू शकता.

Advertisement

▪️ किती अंतरावर लागवड? : बांबू कोणत्या जातीचा आहे यावर बांबूची लागवड ठरते. जातीनुसार प्रति एकर 200 ते 330 बांबू लावणे योग्य राहते. अति दाट लागवड करायचं ठरवलं असेल, तर व्यवस्थापन चोख असावे.

▪️ आंतरपीक : बांबू लागवडीनंतर पहिली 3 वर्षे पिके घेता येऊ शकतात. बांबू लागवडीच्या पहिल्या वर्षी तुम्ही आंतरपीक घेता येते. त्यानंतर मात्र सूर्यप्रकाशाचा विचार करून पीक नियोजन करावे लागते. शेवगा तसेच बहुवार्षिक तूर, पपई इत्यादी पिके घेता येतात.

Advertisement

▪️ किती वर्षात बांबूचे उत्पादन? : शेती कसायची जर नियमित सवय असेल तर फक्त योग्य व्यवस्थापन केलं तर साधारणपणे 4 ते 5 वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न सुरू होईल. अन्यथा 8 ते 10 वर्षांनंतरही उत्पन्न सुरू होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर बांबूच्या लागवडी बायो सीएनजी तसेच जैव इंधनासाठी केल्या जातात.

▪️खते व फवारणी : चांगले कुजलेले शेणखत भरपूर प्रमाणात चांगले असते. याशिवाय मातीच्या गुणधर्मावर रासायनिक खतांची गरज ही अवलंबून असते. लागवड झाल्यावर अगदी सुरुवातीला एखादी बुरशी किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यावेळी रोगाच्या प्रमाणानुसार योग्य ती फवारणी करावी. एकदा का बांबूचे बेट तयार झाले की फवारणीची गरज लागत नाही.

Advertisement

▪️बांबू शेती : खड्डे खोदणे, रोपे लावणे, पाणी देणे, वर्षातून एक किंवा दोन वेळा वेड्यावाकड्या फांद्या तसेच काठ्या तोडणे, रोपांना तसेच बेटांना दरवर्षी गरजेनुसार मातीची भर घालणे अशी कामे व्यवसायिक लागवडीसाठी आवश्‍यक आहे.

▪️ बांबूने जमीन नापीक होते का? : सततच्या पारंपरिक शेतीने जमिनीचं आरोग्य बिघडतं पण वेगळं पीक घेतलं की म्हणजेच बांबू लागवडीने योग्य नियोजन व व्यवस्थापन केले तर जमिनीचा पोत नक्कीच सुधारतो.

Advertisement

▪️ क्षारपड जमिनीमध्ये बांबू लागवड : बांबूची सावल्गारिस ही बांबूची जात क्षारपड जमिनीत लागवड केली तर तग धरणारी आहे. आपण बांबूची नेहमी लागवड करत असाल, तर इतर जातींची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करून निरीक्षण करू शकता.

▪️कुठल्या बांबूची काठी चांगली : बांबू लागवड करण्याच्या पूर्वी आपल्याला नक्की त्याचं काय करायचं आहे, काय उपयोग होणार आहे हे ठरवून लागवड करावी. कारण यावर कोणत्या बांबूच्या जातीची चांगली काठी कोणती समजते. सरळ काठी हि मेस, माणगा, टूलडाया जातीपासून मिळते.

Advertisement

▪️बांबूची तोडणी : अंदाजे 4 ते 5 वर्षांनी एकदा बांबूचे बेट तयार झाले की त्यातील ज्या काठ्याना 3 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा काठ्या निवडून तोडाव्यात. त्यासाठी योग्य व्यवस्थापन असणे गरजेचे आहे म्हणजे उत्पन्न चांगले येईल. याशिवाय आपण कृषी विद्यापीठ, काही शेतीवर आधारित मासिक इ. वरून अधिक माहीती घेऊन अभ्यास करू शकता, याचा फायदा जास्त होईल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement