आचार्य चाणक्य.. महान अर्थतज्ज्ञ नि रणनीतिकार.. त्यांनी नीतिशास्त्राची रचना केली. त्यालाच ‘चाणक्य नीति’ या नावाने ओळखले जाते.. जीवन कसे जगावे, याचे सार या नीतिशास्रात आहे.. आचार्य चाणक्य यांनी आपल्या या नीतिशास्राद्वारे, आपल्या अनुभवांद्वारे समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आजच्या काळातही लागू होते..
आयुष्यात प्रगती साधायची असेल, तर सोबतीला मित्र हवेतच.. मात्र, अनेकदा आपल्या प्रगतीच्या वाटेवर काटे येतात नि ते तुमच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशाच काही लोकांचा उल्लेख केलाय. अशा लोकांशी कधी चुकूनही शत्रुत्व घेऊ नये, अन्यथा ते तुम्हालाच महागात पडू शकते.
आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्रात नेमकं काय म्हटलंय, कोणाशी शत्रूत्व घेतल्यास महागात पडू शकते नि ते कसे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
कोणाशी शत्रूत्व घेऊ नये..?
– खास मित्र : जो मित्र तुमच्यासोबत लहानपणापासून खेळला, एकत्र वाढला. ज्याला तुमची सर्व गुपिते माहिती असतात, अशा खास मित्राशी कधीही शत्रूत्व घेऊ नये.. कारण, तुमच्यात जेव्हा भांडण होईल तेव्हा तो तुमची कमकुवत बाजू जगासमोर उघड करु शकतो. त्यामुळे तुमची सगळी रहस्ये माहित असणाऱ्या मित्रासोबत कधीही शत्रुत्व करू नये, असे चाणक्य म्हणतात.
– मुर्खासमोर निंदा नको : कधीही मूर्ख माणसांसमोर कोणाचीही निंदा करू नये. मूर्खाला स्वतःच्या हिताचे किंवा नुकसानीबाबत काहीही ज्ञान नसते. कोणताही विचार न करता, अशी व्यक्ती कधीही, काहीही बोलू शकते नि त्यात तुमचेच नुकसान होऊ शकते.
– डॉक्टर : डॉक्टरांना देवाचे दुसरे रूपच मानले जाते. डॉक्टरांशी वैर असल्यास तुम्हाला वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
– श्रीमंत व्यक्ती : कधीही चुकूनही श्रीमंत लोकांसोबत वैर पत्करु नका. कारण, असे लोक पैशांच्या जोरावर स्वतःच्या फायद्यासाठी कोणालाही विकत घेऊ शकतात. पैसा वापरून ते तुमचे नुकसान करू शकतात.
– स्वयंपाकी : घरात स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीसोबतचे वैरही महागात पडू शकते. अशी व्यक्ती तुमच्या अन्नात कधीही काहीही मिसळून तुम्हाला खाऊ घालू शकते. ते तुमच्या जिवावर बेतू शकते.
– शस्त्रधारी व्यक्ती : हातात शस्त्रे असणाऱ्या व्यक्तीशी कधीही भांडू नये. रागाच्या भरात अशी व्यक्ती हातातील शस्त्राचा वापर करू शकते. त्यात तुम्हाला शारीरिक हानी होऊ शकते.