SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

युक्रेन बनवतोय ‘हा’ खतरनाक बॉम्ब, रशियाच्या पुतीन यांचा खळबळजनक आरोप..

रशिया-युक्रेन युद्धाच्या (Ukraine Russia War) पार्श्वभूमीवर दोन्ही देश एकमेकांवर शिंतोडे उडवत आहेत. रशियानं युक्रेनवर विविध आरोपही केले जात आहेत. आता रशियाने युक्रेनवर निशाणा साधत धक्कादायक आरोप केला आहे. युक्रेन प्लुटोनियमवर आधारित ‘डर्टी बॉम्ब’ (अण्वस्त्र) बनवण्याची तयारी करत असल्याचं म्हटलं आहे.

आता बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी; अर्ज करण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी

रशियाचा आरोप, पण युक्रेनचा दावा काय?

Advertisement

युक्रेनकडून प्लुटोनियमवर आधारित ‘डर्टी बॉम्ब’ (Dirty Bomb) (अण्वस्त्र) बनवण्याच्या तयारीत आहे, असा आरोप रशियाने केला आहे. युक्रेनच्या चेर्नोबिलमधील अणूभट्टीमध्ये युक्रेन विध्वंसक अण्वस्त्र तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. त्यांनी सोव्हिएतकडून शिकून घेतले होते. मागील काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 साली झालेल्या एका घटनेमुळे हा प्लांट बंद करावा लागला होता. तेव्हा किरणोत्सर्ग होऊन अनेक ठिकाणी, अनेक लोकांवर याचा गंभीर परिणाम झाला होता. मात्र त्यानंतरही आता तिथं डर्टी बॉम्ब तयार करण्यात येत असल्याचा दावा रशियानं केलाय. ही माहीती देत असताना रशियातील वृत्तसंस्थांनी मात्र याबाबत कोणताही पुरावा दिला नाही.

डर्टी बॉम्ब म्हणजे काय?

Advertisement

मिळालेल्या माहीतीनुसार, किरणोत्सारी पदार्थ आणि RDX सारखी स्फोटकं वापरून हा डर्टी बॉम्ब तयार केला जातो. एक स्फोट करून किरणोत्सारी पदार्थ हवेत सोडले जातात. प्रत्यक्षात स्फोट छोटा असल्यानं त्यातून फार मोठं नुकसान होत नाही. मात्र त्यामुळे हवेत परसलेल्या किरणोत्सारी पदार्थाचे दूरगामी परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतील हे नक्कीच! तसं पाहिलं तर आतापर्यंत जगात कुठेही या डर्टी बॉम्बचा वापर झाल्याचा पुरावा आढळला नाही.

रशियाने केलेल्या या आरोपाला युक्रेननं फेटाळूलं आहे. यावर युक्रेननेही भाष्य केलं आहे. “युक्रेननं 1994 साली सोव्हियत युनियनमधून बाहेर पडल्यानंतर अण्वस्त्रांचं समर्पण केलं आहे. त्यामुळे युक्रेनची न्यूक्लिअर क्लबमध्ये सामिल होण्याची कोणतीही इच्छा नाही”, असं राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलंय. आता सध्याची परिस्थिती पाहता रशिया आक्रमक पाऊल उचलण्याच्या तयारीत दिसत आहे. लोक आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement