SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुळशी पॅटर्नमधील ती चहावाली अभिनेत्री आज कोट्यवधींची मालकीण, शेती करणार म्हणून लोकांनी काढलं होतं वेड्यात..

खतरनाक म्हटलं की, आपल्याला आठवतो एकच पॅटर्न तो म्हणजे चित्रपट मुळशी पॅटर्न ! सांगायचं असं की, या ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) चित्रपटामध्ये तुम्ही एक चहाची टपरी चालवणारी सुंदर, गावरान अभिनेत्री गाण्यामध्ये पाहिलीच असेल. मालविका गायकवाड (Malvika Gaekwad) असं तिचं नाव. आता ही मालविका फक्त अभिनेत्रीच नाही तर शेतीमध्ये गोडी असणारी, शेतीत रमणारी मुलगी आहे असं म्हटलं तर विश्वास वाटणार नाही. पण हो ग्लॅमर, पैसा या पेक्षा समाधान महत्त्वाचं असतं आणि ते समाधान तिला मिळालं ते शेतीतून.

इंधनाचे भाव गडगडले..!! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल- डिझेलचे आजचे ताजे दर

आता करतेय कोट्यवधी रुपयांची कमाई..?

Advertisement

अभिनेत्री मालविकाने इंजिअरिंग पूर्ण करून आयटी इंजिनिअर बनली आणि तिने पुण्यातील एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी केली. दिवसांमागुन दिवस जात होते. मग काही दिवस आयटी सेक्टरमधील ग्लॅमर, पैसा तिला बरा वाटला. मस्ती करून सुट्ट्याही एन्जॉय करत दिवस काढले, पण समाधान कुठं दिसतच नव्हतं. हळूहळू तिची घुसमट सुरू झाली आणि अशात ती कमावलेल्या पैशांतून शेती करण्याच्या मागे लागली. मग मालविकाने पगाराच्या पैशातून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दीड एकर शेती घेऊन त्यात काय करावे हे व्यवस्थित अभ्यास करून ठरवले आणि मग काही दिवसांत मोठा धाडसी निर्णय घेतला. रासायनिक शेतीकडे न वळता आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर अशी सेंद्रिय शेती करण्याचा विचार तिने केला.

मालविकाने शेती जमत नसतानाही शेती करण्याच्या निर्णयामुळे अनेक जणांची टोमणेबाजी सहन केली. सुरुवातीला तिच्या नातेवाईकांनी, मित्रांनी तिला ‘हे काय करतेय’ म्हणून वेड्यात काढलं आणि तिने हीच प्रेरणा म्हणून त्यात प्रयत्न सुरु ठेवले. मालविका तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने आणखी दोन जणांची मदत घेतली. तिच्याच विचाराचे दोन मित्र मिळाले आणि मालविका सेंद्रिय शेतीत इतकी रमली आणि तिने चक्क तिच्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीलाही धाडकन लाथ मारली आणि शेतीत एकाग्रतेने काम करत राहिली.

Advertisement

मालविकाने आता शेतीती पुढे खूप काही काम करून स्वत:ची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी देखील सुरू केली. आसपास राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना देखील याचा थेट फायदा झाला. कंपनी चालवणाऱ्या मालविकाने बिझनेस माइंडने पुढचं प्लॅनिंगही ठरवलं होतं. तिने तिच्या विश्वासू दोन मित्रांना सोबत घेऊन दुग्ध व्यवसायातही उडी टाकली. विशाल चौधरी, जयवंत पाटील आणि मालविका अशा तिघांनी ‘हंपी ए 2’ नावाची कंपनी सुरू केली. दूध, तूप, दही,पनीर सोबत मिल्क ऑइल, कोकोनट ऑइल यासारखे अनेक पदार्थ त्यांच्या कंपनीत बनू लागले. आता दिवस बदलत चालले आहेत, कारण आता ही कंपनी तब्बल 18 कोटींच्या घरात गेली आहे. कष्ट घेऊन, अपार परिश्रम करत वर्षाला जवळपास 4 कोटींचा नफा ते या कंपनीतून कमावताना दिसत आहे.

मनोरंजनविषयक पाच महत्त्वाच्या घडामोडी…

मुळशी पॅटर्न हा सिनेमा मालविकाला कसा मिळाला?

Advertisement

मालविका आपल्या रोजच्या रूटिनप्रमाणे एकदा जिममध्ये वर्क आऊट करताना प्रवीण तरडे यांच्या एका खास मित्राने तिला पाहिलं. त्याने अचानक तिला चित्रपटात काम करणार का? असं विचारलं. मालविकाने हसून ‘मला त्यातलं काही माहित नाही पण चित्रपट काम करायला आवडेल,’ असं म्हटलं. मग काय मित्राने प्रवीण तरडे यांची भेट घालून दिली आणि तिची एंट्री होताच मुळशी पॅटर्न मध्ये झळकायची संधी मिळाली. पण शेती करण्यातच तिचा विशेष रस आहे असं ती नेहमी म्हणायची आणि तिने ते सध्या ते करून दाखवलं. मालविका ही बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे. 2020 साली मालविका ही सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्नाच्या बंधनात अडकली. आता ती तिचा बिझनेस आणि शेती असं सगळं काही सांभाळत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement