SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘जिओ’, ‘एअरटेल’चे धमाकेदार प्लॅन.., ‘अ‍ॅमेझाॅन प्राईम’, ‘हाॅटस्टार’सह मिळणार 15 ‘ओटीटी’ प्लॅटफाॅर्म..

गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम कंपन्यांमधील स्पर्धा कमालीची वाढलीय. अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे खेचण्यासाठी कंपन्यांकडून विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. अर्थात, त्यात आघाडीवर आहे, ‘रिलायन्स जिओ’ नि त्यापाठोपाठ एअरटेल..

ग्राहकांसाठी या दोन कंपन्यांकडून स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आले आहेत. त्यात अनलिमिटेड काॅलिंगसह मेसेज, डाटासह ओटीटी प्लॅटफाॅर्मचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जात आहे.. ‘रिलायन्स जिओ’ नि ‘एअरटेल’ या टॉप टेलीकॉम कंपन्यांच्‍या अशाच काही ‘टॉप ब्राॅड बॅंड प्‍लॅन’बाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘जिओ’चा 999 रुपयांचा प्लॅन
‘जिओ’चा हा सर्वात लोकप्रिय ‘ओटीटी (OTT) ब्रॉड बँड प्लॅन’ आहे. त्यात 999 रुपयांऐवजी 150Mbps स्पीडवर 3300 जीबी डाटा मिळतो. शिवाय अनलिमिटेड काॅलिंग, मेसेजसह तुम्हाला अमेझाॅन प्राईम (Amazon Prime Video), डिस्ने+हाॅटस्टार (Disney + Hotstar), इरोस नाऊ (Eros Now) यांसह 15 ओटीटी प्लॅटफॉर्मचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन दिले जाते.

‘एअरटेल’चा प्लॅन
‘एअरटेल’चा ‘एंटरटेनमेंट’ ब्रॉडबँड प्लॅनही 999 रुपयांमध्येच मिळतोय.. त्यातही ग्राहकांना 3300 जीबी डाटा, जाे जिओपेक्षा जास्त 200 Mbps वर उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमेझाॅन प्राईम, डिस्ने+हाॅटस्टारच्या सबस्क्रिप्शनसह ‘विंक’ म्युझिकचा आनंद घेता येणार आहे…

Advertisement

‘बीएसएनएल’चा ब्रॉडबँड प्लॅन
सरकारी टेलिकॉम कंपनी, अर्थात ‘बीएसएनएल’ (BSNL)नेही ‘ब्रॉड बँड प्लॅन’ ऑफर केला आहे. जिओ-एअरटेलपेक्षा बीएसएनएलचा प्लॅन स्वस्त असून, तो 749 रुपयांतच मिळतोय.. मात्र, या प्लॅनमध्ये 100Mbps स्पीडने 1000 जीबी इंटरनेट दिले जाते. मासिक डेटा संपल्यास इंटरनेटचा वेग 5 Mbps पर्यंत कमी होईल.

‘नेटप्लस’चा धमाकेदार प्लॅन
‘नेटप्लस’चाही 999 रुपयांचा ‘ब्रॉड बँड’ प्लॅन असून, त्यात तुम्हाला 200 Mbps स्पीडने ‘अनलिमिटेड’ डेटा मिळणार आहे. शिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांना कॉलिंगचे फायदेही दिले जात आहेत. हा प्लॅन घेताना, तुम्ही फक्त अमेझाॅन प्राईमचे सदस्यत्व घेऊ शकता किंवा जी-5 प्रीमियम, वूट सिलेक्ट (Voot Select) आणि ‘इरोस नाऊ’च्या एकत्रित सदस्यतांचा लाभ घेता येणार आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement