SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्याबाबत (DA) सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? जाणून घ्या..

देशातील केंद्र सरकार (Central Government) आपल्या विविध योजना राबवून सामान्य लोकांना लाभ देत असते. आता केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी आणखी पुढे जात विचार केला आहे. कोणत्या ना कोणत्या मुहूर्ताला वेतनासंबंधी सरकार बातमी देत असते. केंद्र सरकार आता लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी आणि सकारात्मक बातमी देण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात अधिक आनंदाची भर पडणार आहे.

इंधनाचे भाव गडगडले..!! जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील पेट्रोल- डिझेलचे आजचे ताजे दर

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई थकबाकीबाबत (7th Pay Commission DA Hike) लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डीए (Pending Dearness Allowance) देणार असल्याची वार्ता सगळीकडे पसरत आहे.

Advertisement

देशातील प्रशिक्षण विभाग आणि वित्त मंत्रालय, खर्च विभाग यांच्या अधिकाऱ्यांसह जेसीएमची संयुक्त बैठक पुढील काही दिवसातंच होणार असल्याची चर्चा आहे. महागाई भत्याविषयी ही बैठक होऊ शकते, असं जेसीएमचे राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनीही सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या DA (महागाई भत्ता) बाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

अधिक माहिती अशी की, समजा जर केंद्र सरकारने मागील 18 महिन्यांचा प्रलंबित डिए एकत्रितपणे भरला तर देशातील अनेक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल 2 लाख रुपयांपेक्षाही अधिक रक्कम सापडू शकते. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना चमचमीत दिवस येणार आहेत. सरकार या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा वेगवेगळे लाभ देत असते आणि खर्चात मदत म्हणून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून डीए दिला जातो.

Advertisement

दरम्यान, देशात काही राज्यांमध्ये निवडणूक चालू असताना काही घोषणा या निवडणुकीच्या निकालानंतरही होऊ शकतात किंवा आधी दिलेली आश्वासने एखाद्या पक्षांचे सरकार सत्तेत आल्यानंतर पूर्णही होऊ शकतात. प्राप्त माहितीनुसार, असा अंदाज आहे की पेट्रोल व डिझेलच्या, सोने-चांदीच्या, खाद्द्यतेलाच्या दरात सर्वाधिक वाढ होणार आहे. ही निवडणुकीच्या निकालानंतर साधारणतः 10 मार्चच्या जवळपास होऊ शकते. या काळात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या डीए थकबाकीबाबत मोठी अपडेट देऊ शकते. तसेच, 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आणि होळीपूर्वीच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना डिए बाबत मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत (Dearness Allowance before Holi) असू शकते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement