SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘झुंड’ चित्रपटावर बंदीची मागणी, कोर्टाने निर्मात्याला ठोठावला 10 लाखांचा दंड..

नागराज मंजुळे.. एक संवेदनशील लेखक, कवी नि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक.. शाॅर्ट फिल्म असो वा मोठ्या पडद्यावरील चित्रपट.. आतापर्यंत नागराज यांनी समाजातील वंचित घटकाचे दु:ख, त्यांचं जगणं चित्रपट माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे..

नुकताच नागराज यांचा ‘झुंड’ हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.. नागराजने प्रथमच हिंदी सिनेमा केला असून, त्यातही झोपडपट्टीत हरवलेलं टॅलेंट समोर आणले आहे. प्रमुख भूमिकेत बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन असल्याने ‘झुंड’ला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते आहे..

Advertisement

नागपूर येथील विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. मात्र, हैदराबाद येथील एका चित्रपट निर्मात्याने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करीत तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने नुकताच या खटल्याचा निकाल दिला असून, याचिका दाखल करणाऱ्या या निर्मात्यालाच तब्बत 10 लाखांचा दंड ठोठावलाय.

नंदी चिन्नी कुमार, असे या हैदराबादच्या चित्रपट निर्मात्यांचे नाव आहे.. तेलंगणा हायकोर्टाने त्यांना 4 मार्चला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून ही रक्कम एका महिन्यात ‘पीएम कोविड-19 रिलीफ फंडा’त भरण्याचे निर्देश दिले आहेत. वेळेत रक्कम जमा न केल्यास, जिल्हाधिकार्‍यांनी 30 दिवसांत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करावी, असे आदेशात म्हटले आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?

निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी फुटबॉलपटू अखिलेश पॉल याच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे मालकी हक्क खरेदी केले होते. त्यानंतर त्यांना 2018 मध्ये असं समजलं, की अखिलेश पॉल याच्या टीमला विजय बारसे यांनी प्रशिक्षण दिले असून, बारसे यांच्यावरच नागराज यांचा चित्रपट येत आहे.

Advertisement

कुमार यांंनी लगेच कोर्टात धाव घेतली. नागराज यांच्या चित्रपटात अखिलेश पॉल याच्या जीवनातील घडामोडी दाखवल्या जाऊ शकतात. आपण पाॅलवरील चित्रपटाचे मालकी हक्क खरेदी केल्याने ‘झुंड’ सिनेमावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत केली होती. न्यायालयाने कुमार यांच्या बाजूने 17 डिसेंबर 2020 रोजी निकाल दिला. त्यामुळे ‘झुंड’वर बंदी घातली गेली..

न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘झुंड’चे निर्माते व नंदी चिन्नी कुमार यांच्यात समजोता झाला. कुमार यांच्या अटी मान्य केल्यानंतर, त्यांनी ‘झुंड’ प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. या चित्रपटावरील बंदी उठवण्यात यावी, अशी याचिका कुमार यांनीच नंतर दाखल केली. मात्र, हे सगळे प्रकरण मिटेपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे न्यायालयाने म्हटलं होते.

Advertisement

दरम्यान, न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच ‘झुंड’ प्रदर्शित झाला. त्यामुळे तेलंगणा हायकोर्टाने कुमार यांची याचिका अमान्य केली. तसेच, न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याबद्दल कुमार यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला…

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement