SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आता हळूहळू तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. वाढत्या आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल. मुलांशी मतभेद संभवतात.

वृषभ (Taurus): आज एक सकारात्मक लांबचा प्रवास देखील होऊ शकतो. छोट्या अर्धवेळ व्यवसायासाठीही वेळ काढणे सोपे जाईल. मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल.

मिथुन (Gemini) : लोकांना तुम्ही तुमच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पराभूत करू शकता. मनातील दुर्बलता आणि दोष यांचा त्याग करा. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल.

Advertisementकर्क (Cancer) : आज तुम्हाला काही नवीन संपर्कातून लाभ मिळेल. भूतकाळाच्या संदर्भात संशोधनही फायदेशीर ठरू शकते. स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजरांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

सिंह (Leo) : आज तुमच्या कुटुंबात एखादे शुभ कार्य आयोजित करण्याची चर्चा सुरू राहील. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. संमिश्र घटनांचा दिवस. अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल.

कन्या (Virgo) : तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी, सध्या तुम्ही केवळ कायमस्वरूपी वापराच्या वस्तू खरेदी कराव्यात. आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.

Advertisementतुळ (Libra) : संध्याकाळी विशेष पाहुणे येऊ शकतात. व्यर्थ कामांपासून दूर राहा. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमच्यासमोर विरोधकांची झुंबड उभी राहू शकते. व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल.

वृश्‍चिक (Scorpio) : प्रगती पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. तुमची स्वतःची नजर तुमच्या कर्तृत्वावर देखील असू शकते. जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

धनु (Sagittarius) : अनेक दिवसांपासून व्यवसाय नियमित नसल्यामुळे, अस्थिरता तुम्हाला सोडत नाही. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी.

Advertisementमकर (Capricorn) : महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, त्यामुळे प्रयत्न करत राहा. जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.

कुंभ (Aquarious) : प्रगतीचा हा वेग कायमस्वरूपी ठेवणं हेच तुमचं मुख्य काम असायला हवं, नाहीतर भविष्यात तुमची प्रतिष्ठा पणाला लागू शकते. व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात.

मीन (Pisces) : तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला नोकरी, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात पूर्ण सुधारणा हवी असेल तर तुम्हाला त्याग करावा लागेल. जवळची व्यक्ती भेटेल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल.

Advertisement