SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एलआयसी’च्या ‘या’ पाॅलिसीत पैसे गुंतवा.., तुमच्या मुलीच्या लग्नाला मिळतील 31 लाख रुपये..!

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी.. ‘एलआयसी’.. अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ..! विविध विमा योजनांच्या माध्यमातून ‘एलआयसी’ (LIC) नागरिकांचे भविष्य सुरक्षित करतेच.. शिवाय सुरक्षित गुंतवणुकीची, तसेच त्यातून चांगल्या परताव्याचीही हमी देते.. एलआयसीमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात प्रत्येक जण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करीत असतो. मग ते मुलांचे शिक्षण असो वा लग्न… त्यातही घरात मुलगी असेल, तर पालक सुरुवातीपासून आर्थिक तरतूद करण्याच्या मागे लागतात.. पालकांची ही गरज ओळखून ‘एलआयसी’ने काही दिवसांपूर्वीच खास मुलींसाठी एक योजना सुरु केली होती.

Advertisement

‘एलआयसी’च्या या विमा योजनेचे नाव आहे, ‘कन्यादान पॉलिसी’.. मुलीच्या लग्नाचे, शिक्षणाचे अनेक पालकांना टेन्शन आलेलं असतं. मात्र, या पाॅलिसीत गुंतवणूक केल्यास, कोणत्याही पालकाला मुलीची काळजी करण्याची गरज पडणार नाही..

कन्यादान पॉलिसीत रोज थोडीफार गुंतवणूक केली, तरी मुलीच्या लग्नापर्यंत तुम्ही मोठी रक्कम जमवू शकता.. कन्यादान पॉलिसीमध्ये एकदा पैसे गुंतवल्यास, मुलीच्या भविष्याची काळजीच दूर होऊ शकते.

Advertisement

कन्यादान पॉलिसीबाबत…
‘कन्यादान’ पॉलिसीमध्ये तुम्हाला रोज फक्त 150 रुपये, म्हणजेच महिन्याला 4530 रुपये गुंतवावे लागतील. ही प्रीमियम रक्कम 22 वर्षांसाठी असून, 25 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला तब्बल 31 लाख रुपये मिळणार आहेत. त्यातून मुलीचे लग्न किंवा चांगले करियर, तिचा स्वत:चा व्यवसायही करता येईल..

आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो, मुलीचा जन्मदाखला या कागदपत्रांसह एक अर्ज द्यावा लागेल. चेक किंवा रोख रकमेद्वारे तुम्ही प्रीमियम भरू शकता. ‘कन्यादान पॉलिसी’चा लाभ घेण्यासाठी जवळचे एलआयसी ऑफिस / एजंटशी संपर्क साधू शकता. ‘एलआयसी’च्या अधिकृत वेबसाइटवरही याबाबत माहिती मिळेल.

Advertisement

‘एलआयसी कन्यादान’ पॉलिसीसाठी वडिलांचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. सोबतच मुलीचे किमान वय 1 वर्ष असावे. ही योजना 25 वर्षांसाठी असली, तरी तुम्हाला फक्त 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. तुमच्या व मुलीच्या वयानुसारही पॉलिसीची कालमर्यादा कमी केली जाते.

असे होणार फायदे…
पॉलिसी घेतल्यानंतर विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मिळतील. ही रक्कम वार्षिक हप्त्यात दिली जाईल.
– विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला 10 लाख रुपये मिळतील.
– पॉलिसी 15 वर्षांसाठी घेतली, तरी प्रीमियम 12 वर्षांसाठीच भरावा लागेल.
– पॉलिसी सरेंडर करायची असल्यास ती 3 वर्षांनी करता येते.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement