SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भांडखोर सुनेला घरातून हाकलण्याचा सासु-सासऱ्यांना अधिकार, दिल्ली हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय..!

घर म्हटलं म्हणजे, भांड्याला भांडे लागणारच.. नेहमी कानावर पडणारं हे वाक्य.. प्रत्येक घरात भांडण होतच असतात.. मात्र, काही वेळा घरगुती वाद इतका विकोपाला जातो, की घरात राहणे मुश्किल होते. त्यातही सासु-सुनेची भांडणे तर अनादी काळापासून चालत आलीत.. चित्रपट, मालिकांमध्ये हा विषय घासून गुळगुळीत झालाय..

कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे

हे सगळं आता सांगण्याचे कारण म्हणजे, दिल्ली हायकोर्टाने दिलेला निर्णय.. कोर्टाच्या या निर्णयामुळे कित्येक सुनांची झोप उडालीय, तर त्याच वेळी सासवांच्या मनात लाडू फुटत असतील.. नेमकं हे काय प्रकरण आहे, दिल्ली हायकोर्टाने काय निर्णय दिलाय, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?
मुलगा नि सुनेच्या रोजच्या भांडणामुळे सासू वैतागली.. घरातील कलहाला त्रासून मुलगा घर सोडून निघुन गेला. सून तिच्या वृद्ध सासूकडेच राहिली. तिला हे घर सोडायचे नव्हते. सासूला भांडखोर सून घरात नको होती. त्यामुळे सुनेला घराबाहेर काढण्यासाठी सासरच्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.

2016 मध्ये ट्रायल कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत सासरच्यांनी दावा केला की, मालमत्तेचे ते पूर्ण मालक आहेत. त्यांचा मुलगा दुसऱ्या ठिकाणी राहतो नि ते सुनेसाेबत राहण्यास इच्छुक नाहीत.. मात्र, कुटुंबाच्या संयुक्त भांडवलाव्यतिरिक्त वडिलोपार्जित मालमत्तेच्या विक्रीतून ही मालमत्ता खरेदी केल्याने सुनेला तेथे राहण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यानुसार ट्रायल कोर्टाने प्रतिवादीच्या बाजूने निकाल दिला..

Advertisement

दरम्यान, हे प्रकरण दिल्ली हायकोर्टासमोर आले.. त्यावर दिल्ली हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटलेय की भांडखोर वृत्तीच्या सुनेला संयुक्त परिवारात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच संपत्तीचे मालक तिला घराबाहेर काढू शकतात. वृद्ध आई-वडिलांना शांतपणे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. सुन रोज भांडण करीत असल्यास ते तिला घरातून हाकलवू शकतात.

वृद्ध सासूने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सुनेसोबत राहणे योग्य होणार नाही. सध्याच्या प्रकरणात लग्न टिकून असेपर्यंत सुनेला ऑप्शन म्हणून एखादे घर देण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने दिला आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement