SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर… शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, सोलर कृषिपंपासाठी ‘ही’ बॅंक देणार पैसा…!

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी अशीच एक आगळी-वेगळी योजना जिल्हा बॅंकेतर्फे राबवण्यात येणार आहे. त्याचे सुतोवाच नुकतेच जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी केले..

विजेबाबत नेहमीच ओरड होत असते. कधी रात्री, तर कधी दिवसा.. त्यातही वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा.. यामुळे पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांचे मोठे हाल होतात. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी कृषिपंपासाठी सोलर प्रकल्प बसवण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती..

Advertisement

सोलरसाठी कर्जवाटप करणार
कर्डिले यांच्या मागणीची दखल घेत, शेळके यांनी एप्रिलनंतर शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी सोलर घेण्यासाठी कर्जवाटप करणार असल्याची ग्वाही दिली. नगर तालुक्यातील सचिव, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालकांची नगर शहरात सोसायटीच्या कर्जवसुलीबाबत बैठक झाली. त्यात शेळके यांनी हे आश्वासन दिले..

शेळके म्हणाले, की “प्रत्येक सहकारी संस्थेने ठराव करून 100 टक्के वसुली करायची आहे. कर्जवसुली झाली, तरच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देता येतो. पतसंस्थांप्रमाणे सेवा संस्था, सोसायट्यांना एकरकमी कर्जफेडीसाठी योजना सुरु करण्याचा विचार सुरु आहे. भुसार कर्जासाठी 30 हजार रुपये कर्जाची मर्यादा मागणी केली आहे..”

Advertisement

कर्डिले म्हणाले, की शासनाच्या विविध योजनांपासून नगर तालुक्यातील शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी 100 टक्के कर्जवसुली करणार आहोत. कोरोना काळात बँकेने 450 कोटींचे खावटी कर्जवाटप केले. शेतकऱ्यांनी नवे जुने करून पुन्हा हे कर्ज घेतले. शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड केल्यास पुन्हा खावटी कर्ज देणार.”

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement