SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रोहितने जाडेजाची द्विशतकाची संधी हिरावली का..? खुद्द जाडेजानेच केला खुलासा..!

मोहाली येथील पीसीए मैदानावर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे.. पहिले दोन्ही दिवस टीम इंडियाच्या नावे राहिले.. भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यानंतर अवघ्या 108 धावांवर श्रीलंकेच्या 4 विकेट घेतल्याने विजयाच्या दिशेने टीम इंडियाची वाटचाल सुरु असल्याचे दिसते…

भारतीय संघ या कसोटीत मजबूत स्थितीत असला, तरी त्याला वादाचे गालबोट लागले.. आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला हैराण करणाऱ्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळताना, नाबाद 175 धावा फटकावल्या. त्याला द्विशतक झळकावण्याचीही संधी होती नि विशेष म्हणजे कसोटीचा दुसराच दिवस सुरु होता..

Advertisement

असे असताना, कॅप्टन रोहित शर्मा याने अचानक 574 धावांवर भारतीय संघाचा डाव घोषित केला. अजून 4-5 षटकांचा खेळ झाला असता, तरी जडेजाने द्विशतक केलं असतं.. अशा चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.. अनेकांनी कॅप्टन रोहितला व्हिलन घोषीत केलं..

काही क्रिकेट चाहत्यांना राहुल द्रविडच्या कॅप्टन्सीतील निर्णय आठवला. 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात राहुल द्रविडने सचिन तेंडुलकर 194 धावांवर असताना अचानक डाव घोषीत केला होता. द्रविडने घेतलेला निर्णय हा रणनीतीचा भाग असला, तरी त्यावेळी अनेक चाहत्यांना द्रविडचा हा निर्णय कटू वाटला होता. अगदी तशीच पुनरावृत्ती जाडेजाबाबत घडली.

Advertisement

एकीकडे द्रविड व रोहित नेटिझन्सच्या निशाण्यावर असताना, खुद्द जाडेजानेच याबाबत मौन सोडले आहे.. रवींद्र जडेजाने या प्रश्नाचे उत्तर देताना सर्वांची तोंडे बंद केली आहेत.

जाडेजा काय म्हणाला..?
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजाने याचे उत्तर दिले. तो म्हणाला, की “रोहित शर्माने कुलदीपद्वारे मला 200 रन्स करण्याचा मेसेज पाठवला होता. त्यानंतर भारतीय संघ डाव घोषित करणार होता. मात्र, मीच त्यासाठी नकार दिला. आम्ही थकलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना ‘टी’च्या आधी खेळायला दिल्यास, आम्हाला काही विकेट्स घेता येतील, असा विचार मी केला.”

Advertisement

“मी त्यांना (संघाला) सांगितले की खेळपट्टीवर ‘व्हेरिएबल बाउन्स’ आहे. चेंडू वळू लागले आहेत. मीच ड्रेसिंग रुममध्ये मेसेज पाठवला की खेळपट्टीवरून गोलंदाजांना मदत मिळू शकते.. मी सुचवले की आपण त्यांना (श्रीलंकेला) आता फलंदाजीसाठी आमंत्रित केले पाहिजे…!”

“मी माझं हे शतक माझ्या पत्नीच्या भावाला (मेव्हुण्याला) डेडिकेट करतो. त्याने मला अनेकदा शतकी खेळीचा आग्रह केला होता. त्यामुळे मी त्याला हे शतक डेडिकेट करतो..” असंही जडेजा म्हणाला.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement