SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नंदी दूध पित असल्याच्या अफवांनी मंदिरांमध्ये गर्दी, अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला खुलासा..

महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. रविवारची सुटी असली, तरी नेहमीपेक्षा भाविकांची संख्या अधिक होती. विशेष म्हणजे, आज कोणताही सण-उत्सवही नसल्याने ही गर्दी कशामुळे, असा प्रश्न उपस्थित होत होता.. अखेर त्याचे कारणही समोर आले..

कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या कोमट पाणी पिण्याचे फायदे

महाराष्ट्रातल्या काही मंदिरात देवाची मूर्ती दूध पीत असल्याचे ‘व्हिडीओ’ सोशल मीडियातून व्हायरल झाले नि दुधाची वाटी घेऊन भाविकांनी मंदिराची वाट धरली.. देवाला दूध पाजण्यासाठी मंदिरासमोर भाविकांची रिघ लागली.. विशेषत: नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यामधील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती..

Advertisement

नाशिक
नाशिकमध्ये नंदी दूध पीत असल्याच्या अफवा पसरली नि लगेच मंदिरात भाविकांची झुंबड उडाली.. भाविकांनी या प्रकाराची खात्री करण्यासाठी मंदिर गाठलं. काहींनी थेट मंदिरात जाऊन दूधही पाजल्याचे माहिती मिळाली. नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे येथील मंदिरांमध्येही हेच चित्र होतं.

अमरावती
अमरावती जिल्ह्यात अनेक मंदिरात नंदी दूध व पाणी पीत असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. अमरावतीमधील चांदूर रेल्वे, तळेगाव ठाकूर ,अचलपूरसह आदी गावांत असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे तेथेही भाविकांची गर्दी झाली होती.

Advertisement

पालघर
पालघरमधील बोईसर आझाद नगर येथील शिव मंदिरातील नंदी दूध पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला नि मंदिरांची भाविकांची झुंबड उडाली.. अनेक जण हातात दूध घेऊन मंदिरासमोर जमा झाले..

‘अंनिस’ काय म्हणते..?
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावतीचे सचिव हरीश केदार म्हणाले, की 21 सप्टेंबर 1995 रोजीही देशात गणपती दूध पीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.. ‘केशाआकर्षणा’च्या नियमातून असे घडते. देव नि धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावनांना हात घालून ‘अंधश्रद्धा’ पसरविण्याचा हा प्रकार आहे.

Advertisement

नंदीची मूर्ती पाणी-दूध पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दगडाची मूर्ती पाणी-दूध पीत नाही. ते खाली ओघळते. खालील भाग ओला झाल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. चमत्कारावर विश्वास ठेवणार लोक स्वतःचीच फसवणूक करीत असल्याचे केदार यांचे म्हणणे आहे.

वारंवार अशा अफवा पसरवल्या जातात.. ‘सीबीआय’ने या प्रकाराची चौकशी करावी. चमत्कार सिद्ध करा नि 25 लाख रुपये मिळवा, हे ‘अंनिस’चे आव्हान अनेक वर्षांपासून आहे. कोणीही समाजाची दिशाभूल करू नये, असे आवाहन केदार यांनी केले.

Advertisement

(अनेक जिल्ह्यांत देव दूध पीत असल्याचे दावे करण्यात येत असले, तरी ‘स्प्रेडइट’ त्याची पुष्टी करीत नाही..)

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement