SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एटीएम’मधून पैसे काढताना सावधान.., ‘या’ पद्धतीने लूटले जाण्याची शक्यता..

भारतामध्ये सध्या डिजिटलायझेशनचे वारे वाढले आहे. विशेष: कोरोना संकटात ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण वाढले होते. हातात स्मार्टफोन आल्याने बँक नि पैशांचे व्यवहार सोपे झाले आहेत. अर्थात, या डिजिटल व्यवहाराचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही.. गेल्या काही दिवसांत ‘सायबर क्राईम’चा रेटही वाढला आहे..

अ‍ॅमेझॉनचा 4 मार्च 2022 ते 24 एप्रिलपर्यंत मेगा फॅशन विकेंड सुरु; नवीन ग्राहकांसाठी मिळणार ‘या’ आहेत खास ऑफर्स…

डिजिटल व्यवहार करताना, बॅंकांकडून सातत्याने त्यांच्या ग्राहकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. मात्र, त्यानंतरही ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.. सायबर गुन्हेगार कोणत्या तरी मार्गाने लोकांची बँक डिटेल्स मिळवितात. एकदा का तुमची माहिती या चोरांना मिळाली, की अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमचे बँक खाते रिकामे होते.

Advertisement

सायबर गुन्हेगार लोकांना गंडा घालण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे, ‘स्किमिंग’.. अनेकांना सायबर चोरांच्या या प्रकाराबाबत माहिती नसते.. या प्रकाराबाबत आज सविस्तर जाणून घेऊ या..

स्किमिंग म्हणजे काय..?
सायबर क्राईमचा एक प्रकार म्हणजे, स्किमिंग.. तुमच्या ‘एटीएम’ कार्डवरील माहिती चोरुन सायबर चोर अगदी सहज तुमचे बॅंक खाते रिकामे करतात.. ते कसे हे समजून घेऊ या..

Advertisement

पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम सेंटरवर गेल्यावर एटीएम कार्ड स्वॅब करता किंवा काही खरेदी केल्यावर दुकानात एटीएम कार्ड स्वॅप केल्यानंतर तुमच्या बँक खात्याबाबतची माहिती चोरली जाते. त्यासाठी एका विशिष्ट छोट्या यंत्राचा वापर केला जातो.. हे यंत्र एखाद्या स्कॅनरसारखे काम करते. त्या माध्यमातून तुमचे एटीएम कार्ड स्कॅन होते.

एटीएम कार्ड स्कॅन झाल्यानंतर संबंधित माहिती चोराला मिळते.. या माहितीचा उपयोग करून सायबर चोर तुम्हाला ऑनलाईन गंडा घालतात. एटीएमचा पीनकोड मिळवण्यासाठी याच यंत्राला एखादा छोटासा कॅमेराही लावला जाऊ शकतो. हॉटेल, शॉपिंग मॉल, अशा ठिकाणी अशा प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक दक्ष राहायला हवे.

Advertisement

काय काळजी घ्याल..?
– पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’मध्ये गेल्यावर कधीही अनोळखी माणसाची मदत घेऊ नका
– एटीएम मशीनला व्यवस्थित कव्हर करूनच तुमचा एटीएमचा पीन नंबर टाका.
– तुम्हाला एटीएम मशीन शेजारी किंवा मशिनमध्ये एखादे दुसरे डिव्हाईस आढळून आल्यास किंवा ‘एटीएम’चा किपॅड व्यवस्थित काम करीत नसल्यास अशा ठिकाणी पैसे काढू नका..
– एटीएम सेंटरवर काहीही संशयास्पद वाटल्यास, त्याची माहिती पोलिसांना द्या.
– एखाद्या हॉटेल किंवा दुकानात एटीएम कार्ड स्वॅप करण्यापूर्वी सर्व गोष्टींची आधीच खात्री करा..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement