SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल. आजचा दिवस यशस्वी असेल. आजचा दिवस दिर्घकालीन रेंगाळणारी कामे पूर्ण करण्यासाठी चांगला आहे. व्यापारी त्यांच्या कामात विस्तार करण्यात सक्षम असतील.

वृषभ (Taurus): बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोरंजनाकडे कल राहील. मित्रांचा सहयोग मिळणार नाही. व्यापार मध्यम राहील. घरातील वातावरण निराशाजनक असल्याने उत्साहात कमी होईल. कार्यक्षेत्रात सहकारी व कर्मचाऱ्यांशी असलेले संबंध खराब होणार नाहीत याची काळजी घ्या. भागीदारीच्या व्यवसायात आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका.

Advertisement

मिथुन (Gemini) : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू शकते. आर्थिक बाबतीत कोणाची मदत लागल्यास आज मिळू शकते. राजनैतिक क्षेत्रातील लोकं चर्चेत असतील. व्यवसायामध्ये मार्केटिंग संबंधी कामांकडे जास्त लक्ष द्या.

Advertisement

कर्क (Cancer) : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील. . नवे संबंध लाभदायी ठरतील. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या क्षमतेने प्रभावित होतील. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. कौटुंबिक जीवनात प्रेम व ताळमेळ साधला जाईल.

Advertisement

सिंह (Leo) : प्रवासाचे योग येतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नवीन संबंध बनतील. ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. मान-सन्मान व यश प्राप्त होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आज एखाद्या आनंदाच्या बातमीने तुमचा दिवस आनंदी जाईल. परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. पैसे वसूल करण्यासाठी चांगला काळ आहे.

कन्या (Virgo) : प्रवास शक्यतो टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. प्रेम संबंधात यश प्राप्ति. घरात शांतता राहील. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग. अनुकूल लाभदायक परिणाम दिसून येतील. गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांमध्ये यश मिळवण्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागेल.

Advertisement

तुळ (Libra) : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. बुद्धिच्या प्रयोगाने कामात वृद्धि होईल. शत्रुंपासून हानि होण्याची शक्यता. कायदेशीर बाबी सुधारतील. एखादा मित्र व साथीदाराच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती निश्चितच सुधारेल, पण त्याचबरोबर खर्चही वाढतील.

Advertisement

वृश्‍चिक (Scorpio) : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. शासकीय कामे मार्गी लागतील. सुखद यात्रा योग. विद्यार्थींना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. कर्जाची चिंता कमी होईल. संबंधांना महत्व द्या. लाभ होण्याचे योग. व्यापार योजना अंमलात आणण्यासाठी हा चांगला दिवस व वेळ आहे. भाग्य तेजोमयी रूपाने झळकत आहे. विदेशी व्यापारातून लाभ होण्याची चिन्हे आहेत.

धनु (Sagittarius) : आध्यात्माकडे कल राहील. दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. कोणत्याही व्यापारातील समस्येवर उपाय शोधताना मोकळ्या मनाने विचार करा आणि विशेषज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या व्यवसायातील वृद्धीसाठी तुमचे विशेष ज्ञान वापरा.

Advertisement

मकर (Capricorn) : व्यवसायात वाढ होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा. हा स्वतःला सिद्ध करण्याचा आणि मेहनतीच्या फळाचा आनंद घेण्यासाठी चांगला काळ आहे. आरोग्य उत्तम राहील.

Advertisement

कुंभ (Aquarious) : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. क्रियाशील व यशस्वी दिवस तुमच्या प्रतीक्षेत आहे. आज नशिबाची देखील साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा उच्च अधिकाऱ्यांबरोबर योग्य ताळमेळ साधला जाईल.

मीन (Pisces) : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा. व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. आज कोणत्याही वेदना किंवा इतर कोणतेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही. तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल आणि तुमचे काम कुशलतेने हाताळण्यास सक्षम असाल.

Advertisement