SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : रशियाकडून युद्धविरामाची घोषणा, ‘या’ कारणांमुळे घेतला मोठा निर्णय..!

रशिया-युक्रेनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धामुळे सारे जग चिंतेत पडले होते. अमेरिकेसह विविध देशांना रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातल्यावरही रशिया कोणाचेही ऐकत नव्हता. रशियाने वारंवार युक्रेनवर जबरदस्त हल्ले केले. या युद्धामुळे युक्रेन अक्षरश: बेचिराख झाला. प्रचंड नुकसान झालं..

महागाईचा भडका; इतिहासात पहिल्यांदाच पामतेलाचे भाव शेंगदाणा तेलाइतके..!!

Advertisement

रशिया एकामागे एक युक्रेनमधील शहरे आपल्या ताब्यात घेत होता. प्रचंड जीवित व वित्त हानी होत होती, तरीही युक्रेनने नेटाने रशियाचा प्रतिकार केला.. अनेक देशांनी रशियाला युद्ध थांबवण्यासाठी गळ घातली.. मात्र, तरीही रशियाने कोणाचेही ऐकले नाही. मात्र, आता रशियाने अचानक एक मोठा निर्णय घेतला आहे..

रशियाकडून मोठा निर्णय
रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध मानवतेसाठी काही तासांसाठी थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाकडून तात्पूरती युद्धविरामची घोषणा केली आहे, परंतु हे युद्ध फक्त दोन शहरांसाठीच थांबवले आहे. युक्रेनमधून नागरिकांना सुखरुप बाहेर पडता यावे, यासाठी रशियाने काही तासांसाठी युद्धविराम जाहीर केला आहे.

Advertisement

रशियाने काही दिवसांपूर्वीच वेगळा देश म्हणून मान्यता दिलेल्या ‘डोनेत्स्क’मधील ‘मारियोपोल’ आणि ‘वाल्नोवाखा’ या शहरांमध्ये काही तासांसाठी युद्धविराम जाहीर केला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हा युद्धविराम करण्यात आला. या दोन शहरांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत कोणताही हल्ला करणार नसल्याचे रशियाकडून सांगण्यात आलं.

10 लाख नागरिकांचे स्थलांतर
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर एकाच आठवड्यात सुमारे 10 लाख नागरिकांनी युक्रेनबाहेर स्थलांतर केले आहे. इतक्या मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. त्यानंतर युद्धाच्या दहाव्या दिवशी रशियाने नागरिकांना सुरक्षित कॉरिडॉर देण्यासाठी युद्धविराम घेतला आहे..

Advertisement

रशियाने युद्ध थांबवले असले, तरी या दोन्ही देशांमधील परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल. युक्रेनमधून रशियन सैन्य माघारी घेतले जाणार नाही. नागरिकांचे होणारे हाल पाहता, मानवतेसाठी सध्या तात्काळ ‘सिजफायर’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया व युक्रेनमध्ये वाटाघाटीसाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. त्यानंतरही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे.. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर खारकिव्हवर रशियाकडून तुफान हल्ले सुरु आहेत. त्यामुळे या शहरातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हजारो नागरिक मिळेल त्या रेल्वेने शहराबाहेर पडत आहेत..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement