SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलमानची धमाकेदार डायलॉगने एंट्री! ‘टायगर-3’ चित्रपटाचा खतरनाक टिझर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ..

सध्या अनेक चित्रपट रिलीज होत असताना यातच आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान (Salman khan) यांचा ‘टायगर 3’ देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सलमान खान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा अभिनय असलेला बहुप्रतिक्षित ‘टायगर 3’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

बॉलीवूड गाजवणाऱ्या सलमान खानने स्वत: या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत माहीती दिली. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीखही सांगितली आहे. सलमान खानने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन Tiger-3 Teaser शेअर केला आहे.

Advertisement

‘टायगर 3’ टिझर सुरुवातीला भयानक आहे कारण सुरुवातीलाच कतरिना कैफ अनोख्या अंदाजात एक्शन करताना दिसतेय. कतरीना फाईट करताना, स्टंट करताना दिसत आहे. यावेळी ती इतरांना स्टंट कसे करायचे हे शिकवत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत सलमानची झलक शेवटी जबरदस्त डायलॉग करत दिसते, जे चित्रपटाला आणखी भारी बनवेल.

Advertisement

सलमानची एंट्री पुन्हा जबरदस्त डायलॉगने…

टिझरच्या अगदी शेवटी सलमान झोपलेला दिसत असताना उठतो. तेव्हा कतरीना म्हणतेय ‘तयार आहेस का?’ यावर उत्तर देत सलमान म्हणतो, ‘Tiger is Always Ready’ म्हणजेच ‘टायगर हा नेहमीच तयार असतो’. अशा वजनदार डायलॉगने प्रेक्षकही एन्जॉय करतील हे नक्कीच! ‘टायगर 3’ चित्रपटाचा टिझर हा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Advertisement

रॉ एजंटची भूमिका असणारा सलमानचा हा ‘टायगर 3’ चित्रपट प्रेक्षकांना कधी बघायला मिळणार याची तारीखही सांगितली आहे. यासाठी तुम्हाला काही महिने थांबावं लागणार आहे. ‘टायगर 3’ येत्या 21 एप्रिल 2023 ला चित्रपटगृहात हिंदी, तमिळ, तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटींग हे 14 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये सुरु झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा आहेत. कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे, तर आभिनेता इमरान हाश्मी (Imran Hashmi) खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement