SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांनो! 12वी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू, परीक्षेला बसण्यापूर्वी ‘हे’ नियम पाळणे आवश्यक..

राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा (Maharashtra State Board 12th exam) राज्यात 4 मार्च म्हणजेच आजपासून सुरु होत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेस जाताना सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कोविड-19 च्या या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, राज्य बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. शिफ्ट सकाळी 10.30 ते 2 आणि दुपारी 3 ते 6.30 पर्यंत असणार आहे. जे विद्यार्थी 12वी च्या परीक्षेस बसतील त्यांना त्यांचे प्रवेशपत्र (Hall ticket) अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वरून डाऊनलोड करावे लागेल.

Advertisement

सरकारने जारी केलेली नियमावली अशी :

▪️ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अनिवार्य COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे आणि त्यांना त्यांच्या प्रवेशपत्रासोबत स्वतःचा फेस मास्क, हँड सॅनिटायझर जवळ ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.

Advertisement

▪️ परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना रिपोर्टिंग वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

▪️ विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी सुमारे 10 मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.

Advertisement

▪️ विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रात प्रवेश करताना तपासणी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास परवानगी नसणार आहे.

▪️ विद्यार्थी परीक्षा केंद्रामध्ये शिक्षण मंडळाने बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरण, हेडफोन आणि इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट यांचा समावेश वा वापर करता येणार नाही.

Advertisement

▪️ विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देण्याच्या पूर्वी त्यांना दिली गेलेली प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांवर असणाऱ्या सर्व सूचना वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारने यापूर्वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परिक्षा आजपासून (4 मार्च) ऑफलाईन सुरू (12th Offline Exam) होणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यापूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक हेच अंतिम वेळापत्रक असणार आहे, याची नोंद घ्यावी. त्या वेळापत्रकावरुन खात्री करुन विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसावे. अन्य अधिकृत नसलेल्या संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचनाही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement