SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बिग ब्रेकिंग : महान लेगस्पीनर शेन वाॅर्नचे निधन, मृत्यूपूर्वी ‘हे’ ट्विट करुन व्यक्त केलं दु:ख..!

जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे शुक्रवारी (ता. 4) हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाल्याचे समोर येत आहे.. वयाच्या 52 व्या वर्षी शेन वार्न याने अखेरचा श्वास घेतला…या बातमीने अवघे क्रीडा विश्व हादरले आहे..

याबाबत ऑस्ट्रेलियन मीडियाला वॉर्नच्या व्यवस्थापनाने दिलेल्या निवेदनात या वृत्ताबाबत पुष्टी करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे, की “थायलंडमधील व्हिलामध्ये शेन वार्न बेशुद्धावस्थेत आढळून आला. डॉक्टरांनी त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषीत करण्यात आले. त्याला हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला होता..”

Advertisement

दरम्यान, याबाबत भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने ट्विटवर आपले दुःख व्यक्त केलंय. त्यात म्हटलंय की, “विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपर स्टार शेन वॉर्न आज आपल्यात राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. वार्नचं कुटुंब, मित्र नि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना…”

Advertisement

शेन वॉर्न शेवटचं ट्विट
विशेष म्हणजे, आज सकाळीच ऑस्ट्रेलियाचे आणखी एक क्रिकेटर रॉड मार्श यांचे निधन झाले होते. शेन वॉर्न याने ट्वीट करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. हे त्याचे अखेरचे ट्विट ठरले त्यात त्याने म्हटलं होतं, की “रॉड मार्श यांच्या निधनाची बातमी ऐकून वाईट वाटलं. ते आमच्या खेळातले लिजंड होते. अनेक मुला-मुलींसाठी ते प्रेरणास्थान होते. रॉड यांना क्रिकेटविषयी प्रचंड आस्था होती. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या खेळाडूंना त्यांनी खूप काही दिलं…”

Advertisement

ऑस्ट्रेलियाचा महाग लेग स्पिनर म्हणून शेन वार्नला ओळखलं जात होतं. जगभरातील महान बाॅलरमध्ये त्याचा समावेश होता.. 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन याच्यानंतर 1000 आंतरराष्ट्रीय विकेट (टेस्ट आणि वनडे मॅच) घेणारा तो दुसरा बॉलर ठरला होता.

‘आयपीएल’मध्ये राजस्थान राॅयल्स संघाने शेन वाॅर्नच्या नेतृत्वाखालीच पहिले विजेतेपद मिळवले होते. भारताचा मास्टर ब्लाॅस्टर फलंदाज सचिन तेंडुलकर याचा तो खास मित्र म्हणून ओळखला जात होता..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement