SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनीचा वेडेपणा चाहत्यांनाही भावला.. ‘आयपीएल’चा ‘हा’ प्रोमो तुम्हालाही आवडेल..!

‘आयपीएल’च्या 15व्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होत आहे.. या मोसमात 2 नवे संघ उतरल्याने एकूण संघांची संख्या 10 वर गेली आहे.. त्यामुळे यंदा चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘आयपीएल’च्या नव्या सीजनला सुरुवात होण्याआधी अधिकृत ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ने यंदाच्या स्पर्धेचा ‘प्रोमो’ रिलीज केला आहे…

‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी दरवर्षी ‘आयपीएल’ सुरु होण्याआधी या स्पर्धेचे हटके प्रमोशन करतो. यंदाही तो आगळ्या-वेगळ्या अंदाजात चाहत्यांसमोर आला आहे. ‘आयपीएल’च्या प्रमोशनसाठी त्याने केलेला अनोखा लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत… दाक्षिणात्य भारतीय लूकमध्ये यंदा धोनी बस ड्रायव्हर बनला आहे..

Advertisement

प्रोमोमध्ये नक्की काय?
‘आयपीएल-2022’चा प्रोमो काहीसा हटके झालाय.. त्यात धोनी बस चालवताना दिसतो. अचानक रस्त्याच्या मधोमध तो ब्रेक मारुन बस थांबवतो. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते…हळूहळू तो बस मागे घेऊ लागतो, तशी इतर वाहनेही मागे सरकतात. रस्त्यातच बस बंद करुन धोनी ड्राइव्हिंग सीटवरुन थेट बसच्या पायऱ्यांवर जाऊन बसतो.

रस्त्यातच बस थांबवल्याने वाहतूक पोलिस अधिकारी धोनीला विचारणा करतात.. त्यावर धोनीने खास त्याच्या शैलीत उत्तर दिलेय.. रस्त्याच्या बाजूच्या दुकानातील टीव्हीवर आयपीएल स्पर्धेतील ‘सुपर ओव्हर’ चाललीय. ‘हे ‘टाटा आयपीएल’ आहे. हा वेडेपणा आता सामान्य आहे..’ असं धोनी त्यात बोलताना दिसतोय. धोनीचा हा वेडेपणा त्याच्या चाहत्यांना भावला आहे..

Advertisement

दरम्यान, ‘आयपीएल’च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.. या प्रोमोला अवघ्या काही तासांमध्ये लाखो यूझर्सनी लाईक केलं आहे. धोनीचा हा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांनाही कमालीचा आवडला आहे..

आयपीएलमध्ये 74 सामने
‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. पैकी 70 सामने साखळी फेरीत, तर 4 सामने हे प्लेऑफचे असणार आहेत. मुंबई-पुण्यातील एकूण 4 स्टेडियममध्ये साखळी फेरीतील 70 सामने खेळविले जाणार आहेत.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement