SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अरे व्वा, पाण्यातून कमवा, पाण्यासारखा पैसा…! कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ खास व्यवसाय..

कोरोना संकटात अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली.. आजही अनेकांच्या हाताला काम नाही.. अनेक जण आजही नोकरी-धंद्याच्या शोधात आहेत. अशा वेळी हाताशी थोडेफार भांडवल असल्यास तुम्हाला स्वत:चा व्यवसायही सुरु करता येणार आहे.. त्यातून तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेलच; पण तुम्ही इतरांच्याही हाताला काम देऊ शकता..!

असा कोणता व्यवसाय आहे, ज्यातून कमी भांडवलात भरगच्च कमाई होऊ शकते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

हा आहे पाण्याचा व्यवसाय.. होय, पाण्यातूनही पाण्यासारखा पैसा कमावता येतो.. पाण्याला जीवन म्हटलं जातं नि हे पाणीच तुमचे जीवन घडवू शकते.. बाहेर प्रवासात असताना आपण काही नाही, तरी ‘मिनरल वॉटर’ हमखास घेतोच. सध्या या व्यवसायाला मोठी मागणी आहे.

भारतात दरवर्षी बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय 20 टक्के दराने वाढतोय. देशातील ब्रँडेड कंपन्या ‘आरओ’ किंवा ‘मिनरल वॉटर’ व्यवसायात उतरल्या आहेत. बाजारात तर अगदी 1 रुपयाच्या पाऊचपासून पाण्याच्या मोठमोठ्या बाटल्या विकल्या जातात. बाजारातील 75 टक्के वाटा हा 1 लिटरच्या बाटलीबंद पाण्याचा असल्याचे आकडेवारी सांगते..

Advertisement

असा सुरु करा व्यवसाय..
– मिनरल वॉटरचा व्यवसाय (Mineral water business) सुरू करण्यासाठी सुरुवातीला कंपनी सुरू करा. कंपनी कायद्यांतर्गत त्याची नोंदणी करा.
– कंपनीचा पॅन नंबर आणि ‘जीएसटी’ नंबर घ्या.. बोअरिंग, आरओ, चिलर मशीन, कॅन ठेवण्यासाठी 1000 ते 1500 स्क्वेअर फूट जागा लागेल. जेणेकरून पाणी साठवण्यासाठी टाक्या करता येतील.

– पाण्यासाठी कमी ‘टीडीएस’ (कर) द्यावा लागेल, अशी जागा शक्यतो निवडावी. प्रशासनाकडून लायसन्स, ‘आयएसआय’ नंबर घ्यावा लागेल…
– अनेक कंपन्या 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतचे व्यावसायिक ‘आरओ’ प्लांट बनवत आहेत.
– तुम्हाला किमान 100 जार (20 लिटरचे) खरेदी करावे लागतील. त्यासाठी 4 ते 5 लाख रुपये खर्च येईल. तुम्ही बँकेकडून कर्ज मिळवू शकता.
– तासाला 1000 लिटर पाणी तयार होणारा ‘प्लान्ट’ सुरू केल्यास, दरमहा चांगली कमाई होईल.

Advertisement

कमाईचे गणित
तुमचे 150 नियमित ग्राहक असतील, रोज तुम्ही प्रति ग्राहक एक जार पाणीपुरवठा केल्यास 25 रुपये होतील. महिन्याला 1,12,500 रुपयांची कमाई होईल. त्यातून पगार, भाडे, वीजबिल, डिझेल व इतर खर्च वजा करता, हातात चांगला नफा राहिल. जसजसे ग्राहक वाढतील, तसा नफाही वाढत जाईल.

बिसलरी (Bisleri), अॅक्वाफिना (Aquafina), किनले (Kinley) या ब्रँड्सच्या 200 मिली ते एक लिटरपर्यंत पाण्याच्या बाटल्या मिळतात. शिवाय ते 20 लिटरचे जारही पुरवतात. तुम्ही या कंपन्यांची डिस्ट्रिब्युटरशिप घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये गुंतवावे लागतील. मात्र, त्यातूनही तुमची चांगली कमाई होऊ शकेल..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement