SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, निवृत्तीच्या वयाबाबत व पेंशनविषयी सरकार मोठा निर्णय घेणार?

केंद्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर देण्याचा विचार करत आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी (Government Employee news) तुमच्या फायद्याची असणार आहे, कारण कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आणि पेंशनची रक्कम (Pension scheme) वाढवण्यावर सरकार विचार करत आहे.

देशाच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीतर्फे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निवृत्तीचे वय वाढवणे हे देशातील लोकांचे लोकांचे काम करण्यासाठीचे काही दिवस वाढून त्यांचे कौशल्य उपयोगी पडेल यासाठी अहवाल सादर केला आहे आणि पेन्शनविषयी मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Advertisement

समितीच्या अहवालात आणखी कोणत्या गोष्टी..?

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, भारतात सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय (Retire Age) वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी. असा प्रस्ताव समितीने ठेवला आहे.

Advertisement

समितीच्या अहवालानुसार, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावी. यासोबतच या आर्थिक सल्लागार समितीने भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारस केली असल्याचं समजतंय.

कौशल्य विकास करण्यासाठी देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी याविषयी त्यांच्या राज्यांत काही धोरणे राबवावीत. यामध्ये असंघटित क्षेत्रात आणि दुर्गम भागात राहणाऱ्या, निर्वासित व स्थलांतरित लोकांकडे प्रशिक्षण घेण्याचे कोणतेही साधन नाही अशांचाही समावेश व्हायला हवा आणि त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे.

Advertisement

वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस च्या अहवालानुसार

वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतामध्ये सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. म्हणजेच देशातील सुमारे 19.5 टक्के लोकसंख्या निवृत्तांच्या श्रेणीत जाईल. पुढील काही वर्षांतच भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 10 टक्के किंवा 140 दशलक्ष लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत असू शकतात, असा अंदाज आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement