SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. कामात यश प्राप्त होईल. आजचा दिवस शुभ आहे. प्रत्येत कामात तुमचा आत्मविश्वास वाढेल. बाहेर फिरायला जाऊ शकता. संवेदनशील विषयांवर बोलताना खूप सावध राहावे.

वृषभ (Taurus): लहान प्रवास चांगला होईल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंददायक राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील

💁‍♂️ भारतात नापास होणार 90 टक्के विधार्थी युक्रेनमध्ये शिकायला जातात..!! केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विधानावर; तुमचे मत मांडा

मिथुन (Gemini) : कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. विचारांना अधिक चालना देऊन पहावे. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. थोडा संयम ठेवलेला बरा. मुलांना यश मिळेल. मुलांची काळजी घ्या. मनावर थोडा ताण राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. शेतीशी संबंधित पुस्तकांमध्ये बराच वेळ घालवू शकतात.

कर्क (Cancer) : अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. कामातून समाधान लाभेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. वडीलांचे सहकार्य मिळेल. भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. धनलक्ष्मीची कृपा राहील. सहजासहजी आर्थिक लाभ होईल. भेटवस्तू मिळेल. घरात वादविवाद टाळणे चांगले. समस्यांना सामोरे जावे लागेल.

Advertisementसिंह (Leo) : कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या खोडकरपणात रमून जाल. दिवस खेळीमेळीत जाईल. जीवनसाथीशी वाद होतील. व्यवसायात चांगली स्थिती राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे सौंदे ठरतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.

कन्या (Virgo) : कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका. घरगुती वातावरण हसते-खेळते राहील. जोडीदाराची चंगाली साथ मिळेल. भागीदारीत फार विसंबून राहू नका. बदलीची शक्यता आहे. घरी आल्यागेल्याची वर्दळ राहील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. भाग्याची उत्तम साथ मिळेल.

तुळ (Libra) : खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. अति विचार करू नका. काहीशी मानसिक शांतता लाभेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. भविष्याची चिंता करू नका. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू कराल. यश मिळेल.

वृश्‍चिक (Scorpio) : बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. मदतीला मागे हटु नका. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. तणाव दूर होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी चांगली साथ टेईल. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक आवक ठिकठाक राहील.

Advertisement


धनु (Sagittarius) : कामातील निर्णय योग्य ठरतील. क्रोधवृत्तीला आवर घालावी. अहंकाराला खतपाणी घालू नका. कमिशन मधून लाभ कमवाल. कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका. भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. मनात आनंदी विचार राहील.

मकर (Capricorn) : अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या. संमिश्र घटना घडू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होईल. भावंडांशी वाद होऊ शकतात. किरकोळ कारणावरून गैरसमज होतील. नोकरीत मतभेद होतील. मनाच्या संभ्रमात राहू शकतात. बांधकामासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात यशस्वी होऊ शकतात.

कुंभ (Aquarious) : काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. कामाची धांदल उडू शकते. व्यवसायात विक्री चांगली राहील. जीवनसाथीची काळजी घ्या. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या जवळीकीचा कुणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या.

मीन (Pisces) : जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. मन अस्थिर राहील. कामात अडथळे येतील. प्रतिस्पर्धींशी वाद घालणे टाळा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. संपत्तीची कामे होतील. त्यात आपल्याला फायदा होईल.

Advertisement