SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोनू सूद पुन्हा ठरला हिरो! युक्रेनमधील भारतीयांना भारतात आणण्यासाठी ‘अशी’ केली मदत, वाचा थरारक अनुभव..

युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या युद्धामुळे (Ukraine-Russia Conflict) सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. युद्धग्रस्त युक्रेनसह रशियामध्ये भारताचे शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी अडकले आहे. या विद्यार्थ्यांसह काही भारतीयांना त्रास न होता सुखरूप भारतात परत आणण्यासाठी सरकारचं नियोजन चालू आहे. भारत सरकारकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. ‘ऑपरेशन गंगा’ म्हणून हि मोहीम सुरू केली आहे.

महाराष्ट्रासाठी अत्यंत दिलासादायक बातमी; नेमके प्रकरण काय? वाचा सविस्तर

कोरोना काळात स्थलांतरित मजुरापासून ऑनलाईन शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळेसाठी मोबाईल देण्यापर्यंत गरिबांसाठी ‘मसिहॉं’ ठरलेला अभिनेता सोनू सूद युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी धावून आला आहे. याविषयी एका विद्यार्थ्याने युक्रेनची परिस्थिती आणि आपले हाल याविषयी अधिक माहिती दिली आणि मग सोनू सूदच्या टीमने त्याला कशी मदत केली, हा अनुभव त्याने सांगितला.

Advertisement

‘त्या’ विद्यार्थ्याने सांगितला अनुभव..

सोनू सूदने नुकताच त्या मुलाचा संपूर्ण व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लक्ष्मण नावाचा एक विद्यार्थी युक्रेनमधील सर्व प्रसंग सांगताना म्हणाला, “मला गेल्या 15 दिवसात आज मला आराम मिळाला आहे आणि मी आता मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याचे दिसत आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात (Medical) शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे आणि हे सर्वात सुरक्षित होते. काही दिवसांपूर्वी आम्हाला दूतावासाकडून 15 दिवसांच्या युद्धाच्या परीस्थितीबद्दल नोटीस मिळाली. त्यात त्यांनी लिहिले होते की, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तर तुम्ही इथे थांबू शकता”, अशी त्याने माहिती दिली

Advertisement

त्याने दिलेल्या माहीतीनुसार विद्यापीठ म्हणत होते की, “हे युद्ध 8 वर्षांपासून सुरु आहे. पण त्यासाठी विद्यापीठ बंद होणार नाही. ते तसेच सुरु असेल आणि जर तुम्ही तीन दिवस गैरहजर असाल तर ते तुम्हाला काढून टाकतात, असा युक्रेनमध्ये नियम आहे. त्यामुळे त्यावेळी मी घाबरून बाहेर आलो नाही. पण त्यानंतर दूतावासाने सांगितले की, तुम्ही जिथून आला आहात, तिथे निघून जा”, असं तो म्हणाला.

पुढे त्याने सांगितले की, “मी बाहेर गेलो, पण खूप रात्र झाली होती. मला बसने 20 मिनिटांत पोलँड बॉर्डरवर सोडले. कठीण प्रसंगात आम्हाला थंडीत राहण्यासाठी कशीबशी जागा सापडली. मग आम्ही सकाळी लवकर निघालो पण माझ्या एका मित्राने एक व्हिडीओ पाठवलं आणि त्यात म्हटलं होतं की, ‘तिकडे जाऊ नकोस. तेथे सतत मारामारी होत आहे. मुलांना वाईट वागणूक दिली जात आहे.’ त्यामुळे मग मी तिथे न जाता परत माघारी आलो.

Advertisement

सोनू सूदची टीम आली कामाला…

यानंतर तो म्हणतो की, ” मग मी सोनू सूदच्या टीमशी संपर्क साधला. त्यांच्या टीमने मला मार्गदर्शन केले आणि कोणती बॉर्डर अधिक सुरक्षित आहे, याचीही माहिती दिली. पण दुसरीकडे दूतावासाने त्या सीमेचा उल्लेखच केला नव्हता. मी रात्री 12 वाजता बाहेर पडलो. बॅगमधून भारताचा तिरंगा काढला. भारताच्या तिरंग्याला पाहून मला कोणीही अडवले नाही कि विरोध केला. मग आम्हा काही जणांना सीमेवर जेवणही दिले गेले. हे सर्व पाहिल्यानंतर ठीक असल्यासारखं वाटलं आणि मग तिथून मी सुखरूप बाहेर पडू शकलो”, असे त्या विद्यार्थ्याने सांगितले.

Advertisement

यानंतर घडलेल्या या सर्व प्रकारानंतर हे विद्यार्थी सुखरूप भारतात परतले असून अजूनही काही विद्यार्थी युक्रेनमध्ये तर काही युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आहेत. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने नेहमीप्रमाणे या समस्येतही उडी घेत मदत ( Sonu Sood helping Indian students stranded in ukraine ) केली. सोनू सूदने अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन देताना तो म्हणाला, “भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप कठीण काळ आहे आणि कदाचित माझी आतापर्यंतची सर्वात कठीण असाईनमेंट आहे. पण सुदैवाने तिथे अडकलेले अनेक विद्यार्थी हे सीमा ओलांडून सुरक्षित ठिकाणी जात आहे. पण चला प्रयत्न करत राहू, त्यांना आपली गरज आहे.”, असं तो म्हणाला.

दरम्यान सोनू सूदने या पोस्टद्वारे भारत सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि भारतीय दूतावास यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले आहे. ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी हे हंगेरी, ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजीजू हे स्लोव्हाकीया आणि जनरल व्ही़ क़े सिंह यांना पोलंडमध्ये पाठविण्यात आले आहे. आता पुढील 3 दिवसांत अनेक भारतीयांचे भारतात परतणे शक्य होणार आहे, अशी माहिती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement