SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्ची-परश्याचा पुन्हा राडा, नागराज मंजुळे करणार मोठा धमाका, पाहा झुंड सिनेमातील ‘या’ गाण्याचा टिझर..

राज्यात जवळजवळ सगळीकडेच कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर परिस्थितीनुसार काही ठिकाणी चित्रपटगृहे काही मर्यादेसह खुली करण्यात आली आहेत. यामुळे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी अनेकांची गर्दी दिसते आणि प्रत्येक चित्रपटाची कमाई होताना दिसतेय. आता येत्या 4 मार्चला ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू यांचाही अभिनय असलेला हा चित्रपटही जोरदार कमाई करणार असल्याचं दिसतंय. धमाकेदार टायटल सॉंग रिलीज झाल्यानंतर ‘झुंड’ मधील आणखी एका गाण्याचा टिझर लॉंच झाला आहे. या एका गाण्याची आगळीवेगळी झलक सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतेय.

Advertisement

Advertisement

‘झुंड’च्या निमित्ताने ‘सैराट’ या चित्रपटाची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्यासोबतच ‘सैराट’चे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांनी सुद्धा ‘झुंड’साठी मेहनत घेतली आहेत. ‘सैराट’मधल्या सर्वच झिंगाट गाण्यांनी फक्त गावात नव्हे देश-विदेशांत भुरळ घातली होती. आजही ही गाणी कोणाच्या लग्नात, हळद समारंभात दणक्यात वाजवली जातात.

सैराट प्रमाणेच ‘झुंड’मधील गाणीसुद्धा हिट ठरणार की काय, याची एकेक झलक पाहून तसंच वाटत आहे, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. अमिताभ बच्चन यांनी या गाण्याचा टीझर त्यांच्या ट्विट अकाऊंटरवर पोस्ट केला आहे. ‘तैयार हो जाओ एक धमाकेदार खेल के लिए’, असं कॅप्शन देत त्यांनी ‘लात मार’ (Laat Maar song) या गाण्याचा टीझर पोस्ट करत सर्व फॅन्सला शेअर केला आहे.

Advertisement

या गाण्याच्या टीझरमध्ये, फुटबॉलचा खेळ सुरू होण्याआधी बिग बी टॉस करताना दिसत आहेत. आज गुरुवारी म्हणजेच 3 मार्च रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. येत्या 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे दिसणार आहेत.

झुंड चित्रपटाच्या निमित्ताने ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा त्यांचा जलवा दाखवायला परत एकदा एकत्र आले आहेत. महानायक अमिताभ बच्चन हे या चित्रपटात एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळवळ दोन वर्षांचा वेळ लागला आहे. त्यांनी बिग बींना नजरेसमोर ठेवूनच ‘झुंड’ चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिली असल्याचं कळतंय.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement