SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतात ‘या’ गवताची लागवड करून कमवा लाखो रुपयांचा नफा, वेळ काढून नक्की वाचा..

शेती म्हटलं की, आपल्या डोक्यात येतं जमीन, पीक आणि उत्पादन. पण आजच्या काळात शेतीमध्ये उत्पादन जरी चांगलं आलं तरी भाव न मिळाल्याने शेतकरी नुकसानीत जातो. असं कित्येकदा झालं आहे आणि सध्या होतही आहे. मागील काही दिवसांत आपण पाहत आहोत की, सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. यातून काही शेतकऱ्यांना फायदाही मिळत आहे.

जर तुम्हाला काही पिके सोडून इतर काही पिकांतून उत्पादन मिळवायचं असेल तर जमिनीत लागवड करताना पहिल्यांदा जमीन जास्त लागते की कमी हे पाहावं लागतं. आज आम्ही अशा पिकाबद्दल सांगणार आहोत त्याने कमी जागेतही तुम्ही चांगली लागवड करून घेवून भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. अशाच एका शेतीबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.

Advertisement

प्रभासच्या बहुचर्चित ‘आदिपुरूष’ची रिलीज डेट जाहीर; कधी होणार हा चित्रपट रिलीज, पाहा एका क्लिकवर

मग कशी कराल गवताची शेती…?

Advertisement

तुम्ही गवताची शेती करणार असाल, तर गवताच्या शेतीतून लाखो रुपये कमवू शकता. अधिक माहीती अशी की सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. अशा अनेक योजनांचा लाभ काही शेतकरी घेतात पण असंख्य शेतकरी घेत नाहीत. माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा जास्त मिळेपर्यंत राहून जातो. पण आज आम्ही तुम्हाला एका योजनेबद्दल सांगत आहोत ज्यात शेतकऱ्यांना ‘अरोमा मिशन अंतर्गत सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला प्रोस्ताहन दिले जाते. त्यापैकी यापैकी एक म्हणजे लेमन ग्रास (Lemon Grass). ग्रास म्हणजे गवत होय. लेमन ग्रास हे शेतीतून शेतकरी चांगलं उत्पन्न घेवू शकतात. विशेष म्हणजे ही शेती शेतकरी दुष्काळी भागातही करू शकतात आणि चांगला पैसा कमावू शकतात.

फायदे आणि बाजारपेठ

Advertisement

बाजारात आपण पाहतो की, अत्तर, परफ्युम (Perfume) विकण्यासाठी ठेवलेले असतात. हे बनविण्यासाठी लेमन ग्रासच्या पानांचा वापर करण्यात येतो. ते तुम्ही अशा व्यापाऱ्यांना विकू शकतात. यासोबतच निरमा, साबण, तेल, केसांचे तेल, मच्छर लोशन, तसेच यासोबत डोकेदुखीचे औषधे तयार केले जाते. यामध्येही काही प्रमाणात सुगंधाची गरज असते. म्हणून या गवताची मागणी कंपन्या जास्त प्रमाणात करतात. यातून जे निघते तेल परदेशात निर्यात केले जाते. भारतात जवळपास 700 टन लेमन ग्रास तेलाचे उत्पादन होते. यातून शेतकरी चांगला फायदा कमवू शकतो.

लागवड कशी करायची…?

Advertisement

लेमनग्रास ची लागवड नापीक जमिनीतही केली जाते.बअगदी कमी खर्चात जास्त फायद्याचं पीक म्हणून ही शेती करू शकतात. या शेतीचा खर्च खूप कमी आहे आणि खूप निगा राखण्याची तुम्हाला गरज नसते. या शेतीला शेणखत, लाकडाची राख गरजेची असते. कोणत्याही पाण्यातही ही शेती चांगली येऊ शकते. एकदा लागवड केल्यानंतर 6 ते 7 वर्षांपर्यंत या पिकातून उत्पन्न घेवू शकता. यात पानांची कापणी दर 3 महिन्याला शेतकरी करू शकतात. वनस्पतींमध्ये 2-2 फुटांचे अंतर ठेवा.बअशाप्रकारे शेतकरी 12 महिने पाहिजे तेवढे यातून उत्पन्न घेवू शकतात. स्थानिक दुकानदार, छोट्या कंपन्या असा काही सर्व्हे करून माहीती काढा किंवा इंटरनेटवर, यूट्यूबवर तुम्ही अधिक माहीती घेऊन पैसे कमावण्यासाठी लेमन ग्रास ची विक्री करण्यासंबंधी जाणून घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement