SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘फ्लिपकार्ट’चा ‘बिग बचत सेल’ आजपासून सुरु..! ‘या’ खास वेळेत मिळणार ‘कॉम्बो ऑफर’..

ई काॅमर्स क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे, ‘फ्लिपकार्ट’.. ग्राहकांना स्वस्तात मस्त वस्तू मिळण्याचं एक हक्काचं ठिकाण… आताही ग्राहकांसाठी ‘फ्लिपकार्ट’ कंपनी एक खास सेल घेऊन आली आहे.. ‘फ्लिपकार्ट’ने नुकतीच ‘बिग बचत धमाल सेल’ची घोषणा केली आहे. हा सेल आजपासूनच (ता. 4 मार्च) सुरु होत असून, तो 6 मार्चपर्यंत चालणार आहे..

‘फ्लिपकार्ट’च्या या सेलमध्ये ग्राहकांना नेहमीप्रमाणेच विविध वस्तूंवर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे.. ग्राहक या सेलमध्ये स्मार्टफोन, वेअरेबल आणि टीव्ही मॉडेल्स अगदी स्वस्तात खरेदी करू शकणार आहेत. सोबतच, ग्राहकांना ‘बँक ऑफर’ आणि ‘नो-कॉस्ट ईएमआय’चाही पर्याय मिळणार आहे.

Advertisement

‘फ्लिपकार्ट’च्या (Flipkart) ‘बिग बचत धमाल सेल’मध्ये दररोज दुपारी 12, सकाळी 8 आणि सायंकाळी 4 वाजता ‘कॉम्बो ऑफर’सह नवीन सर्वोत्तम डील्स ग्राहकांना मिळणार आहेत. दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांत कमी किमतीत ग्राहकांना उत्पादने खरेदी करता येणार आहेत.

दरम्यान, या सेलमध्ये यूपीआय (UPI) व्यवहारांवर 1000 रुपयांपर्यंत ग्राहकांना सूट दिली जाणार आहे. शिवाय आयडीएफसी (IDFC) फर्स्ट बँक, तसेच ‘येस बँके’च्या क्रेडिट कार्डवर लगेच 10 टक्के अतिरिक्त सूटही मिळणार आहे.. ‘नो कॉस्ट इएमआय’ प्लॅन, जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंजवरही डील्स मिळणार आहे.

Advertisement

कंपनीने वेअरेबल, ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरफोन्स आणि गेम्सशी संबंधित डील्सबाबत जाहीर केलेले नाही.. फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड पर्याय आणि मोबाइल संरक्षण ऑफरही ग्राहकांना मिळू शकते. फ्लिपकार्ट लवकरच या डीलबाबत अधिक माहिती जाहीर करणार असल्याचे समजते..

स्मार्टफोन्सवर मोठी सूट
फ्लिपकार्टच्या या सेलदरम्यान मोटोरोला एज-30 प्रो (Motorola Edge 30 Pro) व रिएलमी 9 प्रो (Realme 9 Pro) हे स्मार्टफोन लॉंच केले जाणार आहेत. आयफोन-12 ( iPhone 12) सीरिजवर आकर्षक डिल्स मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्के, तर टिव्हीवर 75 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement