SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘या’ लोकांना सिमकार्ड मिळणार नाही, मोदी सरकारकडून नवे नियम जाहीर…!

मोबाईल.. सध्याच्या काळात जीवनाचा एक अविभाज्य भाग.. आता 10 पैकी 8 लोकांच्या हातात मोबाईल दिसतो नि या मोबाईलचा आत्मा म्हणजे, सिमकार्ड.. मोबाईलमध्ये सिमकार्ड (Sim card) नसेल, तर तो मोबाईलचा काय कामाचा..? त्यामुळे मोबाईलइतकेच महत्त्व या सिमकार्डलाही आहे.

स्मार्टफोनमुळे जग अधिक ‘स्मार्ट’ झाले असले, तरी त्याचे तोटेही दिसतात.. स्मार्टफोनचा चुकीचा वापर होऊ नये, तो चुकीच्या हातात जाऊ नये, यासाठी मोदी सरकारने मोबाईल युजर्ससाठी (mobile users) सिमकार्डबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत.. दूरसंचार विभागाने काही दिवसांपूर्वी याबाबतचे आदेश जारी केले आहेत….

Advertisement

सिमकार्डबाबत नवे नियम..
– आता 18 वर्षांखालील मुलांना सिमकार्ड विकत घेता येणार नाही. नव्या नियमांनुसार कोणतीही कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सिमकार्ड विकू शकत नाही. 18 वर्षांवरील नागरिक नवीन सिमसाठी आधार किंवा डिजी लॉकरमधील कोणत्याही दस्ताऐवजासह स्वतःची पडताळणी करू शकतात….

– एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असेल, तर अशा व्यक्तीलाही नवीन सिमकार्डही देता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन करुन अशा लोकांला सिमकार्ड विकले गेल्याचे लक्षात आल्यास संबंधित टेलिकॉम कंपनीला दोषी मानलं जाईल.
– प्रीपेड सिमचे ते पोस्टपेडमध्ये रुपांतर करण्यासाठी सरकारने ‘ओटीपी’ (OTP) आधारित प्रक्रियेचा आदेश दिला आहे..

Advertisement

– नवीन मोबाइल कनेक्शनसाठी ‘आधार’ आधारित ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने जुलै-2019 मध्ये ‘भारतीय टेलिग्राफ कायदा-1885’मध्ये सुधारणा केली आहे.. पूर्वी नवीन मोबाइल कनेक्शन किंवा प्रीपेडवरून पोस्टपेडमध्ये रुपांतरीत करण्यासाठी ग्राहकांना ‘केवायसी’ प्रक्रियेतून जावे लागत होते.

– मोबाईल वापरकर्त्यांना नवीन सिमकार्ड कनेक्शनसाठी ‘आधार’ आधारित ‘ई-केवायसी’साठी फक्त 1 रुपया शुल्क द्यावे लागणार आहे..
– ग्राहकांना नवे सिमकार्ड घेण्यासाठी फिजिकल फाॅर्म भरण्याची गरज नाही. डिजिटल फॉर्म भरुन नवे सिम घेता येणार आहे….
– भारतात एक व्यक्ती आपल्या नावे जास्तीत जास्त 12 सिमकार्ड खरेदी करू शकतो. पैकी 9 सिमचा वापर मोबाईल कॉलिंगसाठी करता येणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement